अहमदनगर येथील पंचमदा फॅन्स फौंडेशनच्यावतीने प्रसिद्ध गायक मोहंमद रफी यांच्या स्मृतीदिनानिमित्त सोमवारी (31 जुलै) सावेडीच्या माऊली सभागृहात सायंकाळी 6.30 वाजता ‘यादे रफी’… फिर वो भुलीसी याद आयी है… या गीत मैफलचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष संदीप भुसे यांनी दिली.
या संगीत मैफलीत महंमद रफी यांच्या सुमधूर चित्रपट गीतांचा नजराना रसिक प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. यामध्ये स्थानिक कलकारांसह औरंगाबाद, पुणे येथील कलाकार सहभागी होणार आहेत. पंचमदा फॅन्स फौंडेशन 13 वर्षांपासून कला रसिकांसाठी कार्य करत आहे. जुन्या गीतांची जादू आजही रसिकांच्या मनावर कायम असून, ही आवड नवीन पिढीमध्ये रुजविण्यासाठी विविध कार्यक्रम संस्थेच्यावतीने घेण्यात येत असतात, अशी माहिती उपाध्यक्ष डॉ.सत्तार सय्यद यांनी दिली.
31 जुलैला होणार्या कार्यक्रमाच्या प्रवेशिकांसाठी प्रॉमिनंट इंग्लिश स्पिकिंग क्लासेस, सन्मित्र कॉलनी, झोपडी कॅन्टीनसमोर, सावेडी, अहमदनगर आणि शांती ऑडिओ, नेता सुभाष चौक अहमदनगर इथं उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी संदिप भुसे (मो.9822870618) व डॉ.सत्तार सय्यद (मो.9890050305, 9595150305) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पंचमदा फॅन्स फौंडेशनने केले आहे.