दरवर्षी 12 जुलैला ‘जागतिक पेपर बॅग’ दिन साजरा केला जाताे. या दिनानिमित्ताने भारतातील एक सर्वेक्षण समाेर आले आहे. या सर्वेक्षणानुसार भारतातील लाेक दैनंदिन वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडताना जवळपास 79 टक्के लाेक स्वतःची बॅग घेऊन जातात.
भारतात एकेरी वापरल्या जाणार्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आहे. या सर्वेक्षणात असेही समाेर आले आहे की, दुकानदारांनी ऑफर केल्यावर प्लास्टिक पिशव्या स्वीकारण्यास नकार देतात. याचे प्रमाण ४६ टक्के आहे. कागदी पिशव्यांबाबत ग्राहक स्टाेअर्स चालकांना 62 टक्के प्रतिसाद देताे, असेही सर्वेक्षणातून समाेर आले आहे.
पर्यावरणाचे रक्षण, उज्वल भविष्यासाठी दुकानांमध्ये प्लास्टिक पिशव्यांऐवजी कागदी पिशव्या वापरल्या जाव्यात, असेही सर्वेक्षणातील 80 टक्के लाेकांनी म्हटले आहे. 53 टक्के लोक असे मानतात की प्लास्टिकच्या पिशव्या कागदी पिशव्यांपेक्षा अधिक सोयीस्कर आहेत, असे सर्वेक्षणात लाेकांनी म्हटले आहे. जागतिक कागदी पिशवी दिनानिमित्त न्यूज एग्रीगेटर इनशॉर्ट्सने हे सर्वेक्षण केले आहे.