Sanjay Gandhi Niradhar Yojanaः नगर जिल्ह्यातील राहुरी तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या माध्यमातून उत्कृष्ट काम सुरू असून चार बैठकीत सुमारे ११०० लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. लाभार्थ्यांची उत्पन्न मर्यादा व अनुदान रकमेत वाढ करण्यासाठी आपण शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केले.
राहुरी येथील संत गाडगे महाराज आश्रम शाळा येथे संजय गांधी निराधार योजनेच्या प्रकरण मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना मंजुरीचे पत्र वितरण कार्यक्रमावेळी माजी आमदार कर्डिले बोलत होते. यावेळी संजय गांधी योजना समितीचे अध्यक्ष विनीत धसाळ, तहसीलदार नामदेव पाटील, डॉ.तनपुरे कारखान्याचे माजी अध्यक्ष नामदेव ढोकणे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे, सुभाष गायकवाड, रविंद्र म्हसे, माजी उपनगराध्यक्ष आर.आर.तनपुरे, माजी तालुकाध्यक्ष नानासाहेब गागरे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष धीरज पानसंबळ, राहुरी युवा शहराध्यक्ष अक्षय तनपुरे, माजी सभापती भिमराज हारदे, समितीचे सदस्य नारायण धनवट, किरण ससाणे,अजित डावखर, अविनाश बाचकर, दिपक वाबळे आदी उपस्थित होते.
शिवाजी कर्डिले म्हणाले, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून आम्ही राहुरी तालुका संजय गांधी निराधार योजना समितीची निवड केली. समितीची निवड झाल्यानंतर चार बैठकांमध्येच सुमारे ११०० लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळवून दिला. त्यामुळे जिल्ह्यात समितीचे काम उत्कृष्ठ ठरले आहे.अभिमान वाटावा या प्रकारे काम समितीने केले आहे. उर्वरीत लाभार्थ्यांनी देखील आवश्यक त्या कागदपत्रासह समितीकडे अर्ज दाखल करावेत त्यांनाही लाभ मिळवून देण्यासाठी समिती काम करील असा विश्वास व्यक्त करून संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी असलेली उत्पन्न दाखल्याची मर्यादा वाढविण्यासाठी त्याचप्रमाणे अनुदान रक्कमेत वाढ करावी यासाठी आपण शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचे कर्डिले यांनी यावेळी सांगितले.
समितीचे अध्यक्ष पत्रकार विनित धसाळ यांनी प्रास्तविक केले. बैठकीत सुमारे ३६१ प्रकरण मंजूर करण्यात आले असून ३२ प्रकरण पुर्ततेवर ठेवण्यात आले आहे. आज पर्यंत एकूण १०९२ लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यात आला असून लाभार्थ्यांनी कोणत्याही एजंट अथवा त्रयस्थ व्यक्तींकडे प्रकरण न देता संजय गांधी योजना समितीचे पदाधिकारी व जबाबदार कार्यकर्ते यांच्यामार्फत अर्ज सादर करावे. पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यात येईल. तहसीलदार नामदेव पाटील यांनी संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना पात्रता, निकष, पूर्तता वयोमर्यादा, आवश्यक कागदपत्रे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित सुमारे ३०० लाभार्थ्यांना मंजुरीचे पत्र देण्यात आले.
यावेळी नंदकुमार डोळस, जब्बार पठाण,अशोक काळे, काशिनाथ खुळे, सिताराम ढोकणे, बाळासाहेब येवले, आबासाहेब येवले, लक्ष्मण तनपुरे, मा. नगरसेवक बाळासाहेब जाधव, सोपान गागरे, कारभारी खुळे, बन्सीभाऊ औटी, निसार शेख,सुभाष शिंदे, खा.डॉ. विखे यांचे स्वीय सहायक ज्ञानेश्वर विखे, संजय गांधी शाखेचे संजय वाघ आदींसह कार्यकर्ते व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सुभाष गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. अमोल भनगडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.