Theft of Gold ः चोराने सफाईदारपणे हातचलाखी करत महिलेच्या हातातील अडीच तोळे वजनाची सोन्याची बांगडी चोरून नेली. महिला बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन चोराने ही चोरी केली. राहुरी बसस्थानकावर ही घटना घडली.
कावेरी गोरख तांबोळी यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली आहे. कावेरी या लग्न समारंभासाठी बाहेरगावी जायचे असल्याने त्या १ मे रोजी सकाळी १० वाजता राहुरी बस स्थानकात गेल्या. त्यावेळी त्या नाशिक-परळी या एसटी बसमध्ये चढल्या. बसमध्ये चढत असताना काही मुलांनी त्यांना गर्दीचा फायदा घेत लोटले. बसमध्ये गर्दी असल्याने त्या बसमधून खाली उतरल्या.
कावेरी तांबोळी यानंतर त्या तुळजापुर बसमध्ये बसल्या. ती बस राहुरी खुर्द येथून जात असताना हातातील अडीच तोळे वजनाची सोन्याची बांगडी चोरांनी चोरुन नेल्याचे कावेरी तांबोळी यांच्या लक्षात आले. त्यांनी ताबडतोब राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिथे तक्रार दिली. कावेरी तांबोळी यांच्या फिर्यादीवरून चोरीच्या गुन्ह्याची नोंद राहुरी पोलिसांनी घेतली आहे.