अहमदनगरच्या शेवगाव इथल्या आबासाहेब काकडे रिमांड हाेमध्ये माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात झाला. तब्बल 40 वर्षांनंतर वर्गमित्र या मेळाव्यानिमित्ताने एकत्र आले हाेते. अधीक्षक बन्सीधर आगळे हे अध्यक्षस्थानी हाेते. हभप राम उदागे महाराज, प्रा. विजय भाेर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित हाेते.
या मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आलेल्या 40 वर्षापूर्वीच्या मित्रांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. शिक्षकांच्या शिकवण्याच्या पद्धती, चुकल्यावर समजून सांगणे, आवडी-निवडी, वेळप्रसंगी शिक्षकांनी दिलेली शिक्षा, लावलेले प्रेम, शाळेतील कार्यक्रम, खेळ या सर्व गाेष्टींना या मित्रांनी उजाळा दिला.
अहमदनगर आकाशवाणी केंद्राचे माजी प्रमुख बाबासाहेब खराडे, सखाहरी काेरडे, बाबासाहेब जरांगे, भाऊसाहेब साेलट, पुजाराम साेलट, गाेरक्ष भगत, परमेश्वर खराडे, रंगनाथ घारे यांनी मनाेगत व्यक्त केले. इथं घडलेले काही अधिकारी पदावरून निवृत्त, तर काही वेगवेगळ्या ठिकाणी अजूनही कार्यरत आहेत.
बन्सीधर आगळे महाराज यावेळी भाषण करताना खूप भावूक झाले हाेते. सर्व विद्यार्थी या मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आल्याचा त्यांना आनंद झाला. शिवकताना काही विद्यार्थ्यांना मार खावा लागत हाेता. काही अडचणींमुळे मुलांना उपाशी राहावे लागत हाेते. या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. यावेळी त्यांचे डाेळे पाणावले हाेते. या मेळाव्याच्या निमित्ताने त्यांनी शुभेच्छा दिल्या. या मेळाव्याच्या निमित्ताने स्नेहभाेजनाचा कार्यक्रम झाला.