केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे 2021 च्या गांधी शांति पुरस्काराची घाेषणा करण्यात आली आहे. जगप्रसिद्ध गीता प्रेसला 2021 चा गांधी शांति पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराची सन्मानित रक्कम एक काेटी रुपये आहे. या पुरस्काराची रकमेबाबत गीता प्रेसने माेठा निर्णय घेतला आहे.
गीता प्रेसने पुरस्काराच्या रकमेबाबत घेतलेला निर्णय अनेकांना आश्चर्याचा धक्का देणारा आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या पुरस्काराची घाेषणा केली. या घाेषणेनुसार पुरस्काराची रक्कम एक काेटी रुपये आहे. या रकमेबाबत गीता प्रेस बाेर्डने हा सन्मान स्विकारण्याचा मात्र त्यासाेबत मिळणारी तब्बल एक काेटी रुपयांची रक्कम न स्विकारण्याचा निर्णय घेतला आहे. या अगाेदर गीता प्रेस बाेर्डाने एकाही पुरस्काराचा स्वीकारलेला नाही.
गीता प्रेस ही शंभर वर्षांपासून सनातन संस्कृतीचे समर्थक आहेत. त्यांची ख्याती सनातन संस्कृती आणि धार्मिक ग्रंथांच्या रूपातही आहे. गीता प्रेसला गांधी शांतता पुरस्कार दिल्याबद्दल मुख्यमंत्री याेगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचे आभार मानले आहेत.
केंद्र सरकारने दिलेल्या या पुरस्काराचा स्वीकारताना परंपरेनुसार प्रेस काेणाताही सन्मान स्वीकारत नाही. परंतु यंदा ही परंपरा माेडून सन्मान स्वीकारला जाईल, असे व्यवस्थापक यांनी सांगितले. गांधी शांति पुरस्कारामध्ये प्रशस्तीपत्र, एक फ्रेम आणि उत्कृष्ट पारंपारिक हस्तकला, हातमाग कलाकृतीसह एक काेटी रुपयांची रक्कम, असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
गीता प्रेसच्या स्थापनेच्या 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल हा पुरस्कार मिळाल्याने आनंद हाेत आहे. आतापर्यंत काेणताही सन्मान न स्वीकारण्याची आमची परंपरा आहे. सन्मान स्वीकारू पण येणारा पैसा स्वीकारणार नाही, असा निर्णय घेतल्याची माहिती गीता प्रेसचे व्यवस्थापक लालमणी तिवारी यांनी सांगितले.