‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटाने बराच गदाराेळ माजवला हाेता. टीकाकार आणि समर्थक असे या चित्रपटाच्या निमित्ताने समाेरासमाेर आले हाेते. यात हा चित्रपट बाॅक्स ऑफिसवर ब्लाॅकबस्टर ठरला. चित्रपटाने 300 काेटी रुपयांचा टप्पा ओलांडला. काेराेनाच्या साथीनंतर अशी कामगिरी करणारा हा पहिलाच हिंदी चित्रपट ठरला.
‘द कश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले हाेते. अभिनेता अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी आणि दर्शन कुमार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले. काहींनी या चित्रपटाचे काैतुक केले, तर काहींनी जाेरदार टीका केली. आता या चित्रपटाचा अजून एक भाग प्रेक्षकांच्या भेटीला येताे आहे.
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या ट्विटरवरून याबाबतची घोषणा केली आहे. अनेक नरसंहार नाकारणारे, दहशतवादी समर्थक आणि भारताच्या शत्रूंनी काश्मीर फाइल्सवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आता तुमच्यासमोर काश्मीर हिंदूंच्या नरसंहाराचे असभ्य सत्य आणत आहे ज्यावर फक्त एक शैतानच प्रश्न करू शकतो. ‘रडायला तयार राहा’ असे म्हणत अग्निहोत्री यांनी चित्रपटाचा एक छोटासा टीझरही प्रदर्शित केला आहे.
विवेक अग्निहोत्री यांच्या ट्विटरवरील टिझरमुळे या पुढच्या भागातून नक्की काय असेल आणि काय पाहायला मिळणार याबाबत चाहत्यांना उत्सुक्ता लागलीय.