उद्धव ठाकरे यांनी जालना इथं मराठा आंदाेलकांवर पाेलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यावरून राज्य सरकारवर जाेरदार टीका केली आहे. ‘या आंदाेलनाची सरकारजवळ माहितीच नव्हती. हे सरकार म्हणजे, ‘एक फुल दाेन हाफ’ नेत्यांचे आहे’, असा टाेला त्यांनी लगावला.
‘बारसू इथं आंदाेलकांवर अगाेदर लाठीमार झाला. यानंतर वारकऱ्यांवर आणि मराठा आंदाेलकांवर लाठीहल्ला केला आहे. आता महाराष्ट्रातील जनता हे सहन करणार नाही. भाजपने चाय पे चर्चा कार्यक्रम घेत यांनी सत्ता काबीज केली. आता पाण हाेऊ दे चर्चा घेऊन यांनी नऊ वर्षांच्या कारकीर्दीची पाेलखाेल करू या’, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
‘जालना इथं झालेला लाठीहल्ला हा काेणाच्या तरी आदेशाशिवाय हाेऊ शकत नाही. ‘सरकार आपल्या दारी’, हा कार्यक्रम तिथं आयाेजित करायचा हाेता, पण चर्चा करण्यासाठी काेणी गेले नाही. ‘सरकार आपल्या दारी’, कार्यक्रम म्हणजे ‘सरकार आपल्या दारी आणि थापा मारी भारी’, असा आहे’, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
‘गणेशाेत्सव काळात संसदेचे अधिवेशन बाेलविण्याचे कारण काय, असाही प्रश्न उपस्थित करून उद्धव ठाकरे यांनी हे अधिवेशन पितृपक्षात घेण्याचा सल्ला दिला. विशेष अधिवेशन बाेलावून मराठा, धनगर, ओबीसी, आदिवासी समाजाला वटहुकूम काढून आरक्षण दिल्यास आमचा अधिवेशनाला पाठिंबा राहिल. ठाकरे सरकारचे काम आणि पंतप्रधान नरेंद्र माेदी यांची जुमलेबाजी शिवसैनिकांनी घराेघरी जाऊन सांगायला हवी’, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.