एलाॅन मस्क ‘ट्विटर’चे मालक झाल्यापासून त्यात अनेक बदल झाले आहेत. ट्विटरचे बाेधचिन्ह निळा पक्षी देखील बदल हाेणार, असे संकेत एलाॅन मस्क यांनी दिले हाेते. त्यानुसार आता ‘ट्विटर’चा चिरपरिचित निळा पक्षी आता प्रसिद्ध समाजमाध्यमावर दिसणार नाही. त्याऐवजी काळी-पांढरी फुली ‘ट्विटर’ची खूण मानली जाणार आहे.
‘ट्विटर’चे मालक एलाॅन मस्क यांनी साेमवारी हे नवीन बाेधचिन्ह लाेकांसमाेर आणला. ‘ट्विटर’चे हे माेठे रिब्रॅंडिंग मानले जात आहे. मस्क यांनी गेल्या वर्षी 44 अब्ज डाॅलरना ‘ट्विटर’ने खरेदी केले हाेते. एलाॅन मस्क यांनी स्वतःच्या ट्विटर हॅंडलवर हा बदल करून ती बाेधचिन्ह पाेस्ट केली आहे.
डेस्कटाॅपवर साेमवारपासून ‘ट्विटर’ची काळ्या पार्श्वभूमीवर पांढरी फुली दिसू लागली आहे. मात्र फाेनवरील अॅपमध्ये निळा पक्षीच माेठ्या प्रमाणात दिसत हाेता. मस्क यांनी नवीन लाेगाेसाठी चाहत्यांकडून कल्पना मागवल्या हाेत्या. रिब्रॅंडिंगनंतर ट्विट हे एक्स नावाने ओळखले जातील, असेही मस्क यांनी स्पष्ट केले आहे.