‘ट्रायल पीरियड’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरमुळे चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. जिनिलीया देशमुख आणि मानव काैल यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत. अपांरपरिक कुटुंबाच्या एकत्र येण्याची कथा या चित्रपटात आहे. हा चित्रपट 21 जुलैला जिओ सिनेमावर प्रदर्शित हाेणार आहे.
या चित्रपटात जिनिलीया व मानव याच्यांबराेबरच शक्ती कपूर, शीबा चड्डा, गजराज राव आणि झिदान ब्राझ सहायक भूमिकांमध्ये आहेत. ही कथा एका अविवाहित आईच्या जीवनाभाेवती फिरते. या भूमिकेत जिनिलीया असून चित्रपटात तिचा मुलागा एकेदिवशी आपण ‘ट्रायल पीरियड’वर बाबा मागवू, आवडला नाही तर परत पाठवून देऊ, असे म्हणताे. यानंतर चित्रपटाचे कथानक जसे पुढे सरकते, तशी धमाल येते.
मुलाच्या या मागणीनंतर एकेदिवशी 30 दिवसांच्या ‘ट्रायल पीरियड’वर एक व्यक्तीला त्याचा बाबा म्हणून बाेलवले जाते. बाबाच्या भूमिकेत मानव कौलने आहे. तो घरी आल्यानंतर अपारंपरिक कौटुंबिक नातेसंबंध, व्यक्तिमत्व संघर्ष आणि अनपेक्षित बंध आणि नात्यातली आव्हानं याभोवती कथा पुढे सरकत जाते.
जिनिलीया देशमुख म्हणाली, “मी माझ्या आयुष्याच्या अशा टप्प्यावर आहे की, तिथे मी चित्रपटाची निवड त्याच्या गुणवत्तेवर न करता त्याच्या गुणवत्तेसाठी करते.” मानव कौल याने हा चित्रपट एक भावनिक कथानकाभाेवती गुंफलेला आहे. रोलरकोस्टर आहे. या चित्रपटासाठी आम्ही खूप मेहनत घेतली आहे, असे सांगताे. या चित्रपटाच्या शुटिंगनंतर माझ्या आईने मला खराेखर एक हृदयस्पर्शी पत्र लिहिले. हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच पसंतीला पडेल, असेही मानव काैल याने म्हटले आहे.