TRAI आता कॉल ड्रॉपिंगची समस्या संपणार आहे. ट्रायने यासाठी पुढचे पाऊल टाकले आहे. देशातील सर्व अनोंदणीकृत टेलिमार्केटिंग कंपन्यांवर अधिक कडक कारवाई केली जाईल. सर्व दूरसंचार कंपन्या नोंदणी नसलेल्या टेलिमार्केटिंग कंपन्यांचे तपशील एकमेकांना शेअर करतील. तसेच, सर्व दूरसंचार कंपन्या कोणत्याही प्रकारच्या जाहिराती आणि व्यावसायिक दूरसंचारावर बंदी घालतील. कोणत्याही दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर बंदी घालण्याचे निर्देश ट्रायने दिले आहेत.
