राेजच्या प्रवासासाठी बाईक-स्कूटर शिवाय पर्याय नाही. नाेकरी, काॅलेज, घरगुती कामासाठी बाईक-स्कूटर गरजेचीच झाली आहे. सणासुदी अगाेदर नवीन स्कूटर घ्यायचा विचार करत असल्यास 125 सीसी सेगमेंटवर असेल, तर तुम्हाला पाच लाेकप्रिय स्कूटरच्या किंमती जाणून घ्या. तसेच या स्कूटरचे मायलेज देखील समजावून घ्या. या स्कूटर्सचे फीचर्सबराेबर पॉवर देखील जबरदस्तच आहेत. ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतील.
Honda Activa 125 स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 79 हजार 806 रुपयांपासून आहे. या स्कूटरची किंमत 88 हजार 979 रुपयांपर्यंत आहे. Activa 125 चे मायलेज 55 kmpl पर्यंत आहे. ही सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर आहे.
TVS Jupiter 125 स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 83 हजार 755 रुपये आहे. ती 90 हजार 555 रुपयापर्यंत आहे. TVS ज्युपिटरचे मायलेज 57.27 kmpl पर्यंत आहे. ही दुसरी सर्वाधिक विक्रीची स्कूटर आहे.
TVS च्या स्पोर्टी स्कूटर Ntorq 125 ची एक्स-शोरूम किंमत 84 हजार 536 रुपये एवढी आहे. 1 लाख 05 हजार रुपयापर्यंत आहे. तिचा 56.23 kmpl चा मायलेज आहे.
Suzuki Access 125 स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 79 हजार 400 ते 90 हजार रुपयांपर्यंत आहे. सुझुकीच्या या मस्त स्कूटरचे मायलेज 64 kmpl पर्यंत आहे.
Yamaha REGR 125 FI Hybrid ची एक्स-शोरूम किंमत 84 हजार 230 रुपये ते 95 हजार 330 रुपये आहे. यामाहाच्या या स्पोर्टी स्कूटरचे मायलेज 62 kmpl पर्यंत आहे.