हृदयाचा ठाेका चुकवित विविध डावपेचांनी महिला कुस्तीपंटूनी नगर तालुका तालुका शालेय कुस्ती स्पर्धा गाजवली. मुलींच्या चित्त थरारक कुस्त्यांनी स्पर्धेचा समारोप मंगळावारी झाला. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळ करणारे मुलांमध्ये श्री बाणेश्वर विद्यालय (बुऱ्हाणनगर) व मुलींमध्ये श्री नृसिंह विद्यालय (चास) च्या संघांना जनरल चॅम्पियनशिप चषक प्रदान करण्यात आले.
अहमदनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व नगर तालुका क्रीडा समितीच्या माध्यमातून नगर तालुका तालिम सेवा संघाच्या वतीने नेप्ती, अहमदनगर-कल्याण महामार्गावरील अमरज्योत लॉनमध्ये दोन दिवसीय कुस्ती स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेला नगर तालुक्यातील महिला कुस्तीपटूंचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
शेवटच्या अंतिम कुस्त्या नगर तालुका सामाजिक वनीकरण विभागाचे वन क्षेत्रपाल हेमंत उबाळे यांच्या हस्ते लावण्यात आल्या. यावेळी नगर तालुका तालिम सेवा संघाचे अध्यक्ष नाना डोंगरे, सचिव बाळू भापकर, युवा महाराष्ट्र केसरी विष्णू खोसे, प्राचार्य सुभाष नरवडे, पंच गणेश जाधव, मल्हारी कांडेकर, रमाकांत दरेकर, मिलिंद थोरे, चंद्रकांत पवार, जयश्री भोस, वर्षा बोठे, नगर तालुका कुस्तीगीर संघाचे सचिव संदीप डोंगरे, संजय पुंड, आशिष आचारी आदींसह शालेय महिला कुस्तीपटू, प्रशिक्षक उपस्थित होते.
नगर तालुका शालेय कुस्ती स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी शालेय मुलींच्या कुस्त्या झाल्या. मुलींनी एकापेक्षा एक सरस डावपेचांनी आपल्या उत्कृष्ट कुस्त्यांचा खेळ सादर केला. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात मुलींना दाद दिली. उपस्थित पाहुणे उबाळे व भापकर यांनी अंतिम विजेत्या महिला कुस्तीपटूंना रोख बक्षिसे दिली. मुला-मुलींच्या शालेय कुस्ती स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 14, 17 वयोगटातील मुला-मुलींच्या जिल्हास्तरीय स्पर्धा 15 सप्टेंबर त्रिमूर्ती कुस्ती संकुल नेवासा फाटा (ता. नेवासा) येथे होणार आहे.
जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंची नावे:
14 वर्ष वयोगट मुले फ्रीस्टाईल- ओंकार थोरात (बुऱ्हाणनगर), किरण मगर (जेऊर), स्वस्तिक भोगाडे (मांडवे), कानिफनाथ दुसुंगे (कापूरवाडी), अथर्व गहिले (टाकळी खातगाव), विक्रांत निकाळे (बुऱ्हाणनगर), तुषार धामणे (सारोळा कासार), आयुष बेरड (निंबोडी), यश ठोकळ (सारोळा कासार).
17 वर्ष वयोगट मुले फ्रीस्टाईल- पृथ्वीराज जाधव (भिंगार), स्वराज पानसरे (बुऱ्हाणनगर), सुरज काळे (बुऱ्हाणनगर), उत्कृर्ष कर्डिले (बुऱ्हाणनगर), अनंत राय (आर्मी स्कूल), आदित्य शिंदे (निंबोडी), रोहित बोरुडे (टाकळी काझी), प्रतिक राऊत (नेप्ती), अभिजीत वाल्हेकर (बुऱ्हाणनगर).
17 वर्ष वयोगट मुले ग्रिको रोमन- विशाल कुलाळ (बुऱ्हाणनगर), ओम दुसुंगे (बुऱ्हाणनगर), अनिकेत धाडगे (बुऱ्हाणनगर), मयुर लिमगीरे (बुऱ्हाणनगर), आशिष वारुळे (बुऱ्हाणनगर), आर्यन खेडकर (चिचोंडी पाटील), साई कांडेकर (हिंगणगाव).
19 वर्ष वयोगट मुले फ्रीस्टाईल- निखील जाधव (सारोला कासार), सिध्दार्थ कर्डिले (बुऱ्हाणनगर), अनिल फुलमाळी (रुईछत्तीसी), सुरज चत्तर (टाकळी खातगाव), आदित्य लबडे (बुऱ्हाणनगर).
19 वर्ष वयोगट मुले ग्रिको रोमन- गौरव साळवे (सारोळा कासार), सोमानाथ कार्ले (रुईछत्तीसी), हर्षल कोतकर (रुईछत्तीसी).
14 वर्ष वयोगट मुली फ्रीस्टाईल- वैष्णवी भोसले (सारोळा कासार), ज्ञानेश्वरी काळे (चास), गायत्री खामकर (हिंगणगाव), अर्पिता झेंडे (रुईछत्तीसी), भाग्यश्री कार्ले (चास), संस्कृती कार्ले (चास), ज्ञानेश्वरी भांबरकर (चास).
17 वर्ष वयोगट मुली फ्रीस्टाईल- धनश्री खाडे (टाकळी खातगाव), प्रतिक्षा दळवी (टाकळी खातगाव), ईश्वरी गोंडाळ (चास), गायत्री कार्ले (चास), जयश्री जाधव (चास), समिक्षा कार्ले (चास), ऋतुजा गोंडाळ (चास), प्रणाली आमले (चास).
19 वर्ष वयोगट मुली फ्रीस्टाईल- पूजा धनगर (बुऱ्हाणनगर).