14 वी जागतिक मसाले परिषद नवी मुंबईत 15 ते 17 सप्टेंबर दरम्यान हाेणार आहे. या परिषदेत तस्टेट पॅव्हिलियन्स आणि या उद्याेगातील अग्रणींकडून टेक टाॅक्स अशा अनेक नवीन वैशिष्ट्यांचा पहिल्यांदाच समावेश असणार आहे. ही परिषद मसल्याचे ग्राहक आणि विक्रेते यांच्यासाठी या क्षेत्रातील समस्यांवर चर्चा करणार आहे. व्यवहारीक ज्ञानाचे देवाणघेवाण करण्याचे आणि मसल्याच्या व्यापारात सर्वाेत्तम पद्धती विकसित करण्याचे व्यासपीठ म्हणून काम करेल, असे मत भारतीय मसाले बाेर्डाचे सचिव डी. सथियन यांनी व्यक्त केले आहे.
या जागतिक मसाले परिषदेत 800 ते 1000 प्रतिनिधी सहभागी हाेण्याची शक्यता आहे. सुमारे 80 देशांनी नाेंदणी केली आहे. या परिषदेत जगभरातील देशांचा सहभाग हाेईल, असे सांगितले जात आहे. भारताच्या प्रतिष्ठित जी-20 अध्यक्षतेच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ही जागतिक मसाले परिषद हाेत आहे. या परिषदेच्या माध्यमातून नवनवीन संधी खुल्या करण्याचा उद्देश आहे. 1990 मध्ये जागतिक मसाला परिषदेची स्थापना झाली.
जागतिक मसाले परिषदेची संकल्पना “व्हीजन 2030 ः S-P-I-C-E-S म्हणजेच सस्टेनेबिलिटी, प्राॅडक्विव्हिटी, इनाेवेशन, काेलॅबरेशन, एक्सेलन्स अॅण्ड सेफ्टी” असा आहे. या परिषदेत विविध मुद्यांवर चर्चा हाेणार आहे. अन्नपदार्थाच्या उत्पादन तंत्रज्ञानापासून ते पॅकेजिंगपर्यंत सर्वच गाेष्टींचा समावेश असणार आहे. तसेच मसाले उद्याेगातील अभिनव तंत्रज्ञान आणि उपाय अधाेरेखित करणारे प्रदर्शन यानिमित्ताने हाेणार आहे. टेक टाॅक, नवीन उत्पादनांचे उद्घाटन आणि कुकरी-शाेची सत्रे देखील यानिमित्ताने हाेणार आहेत.