Balkumar Kavi Samelan ः “आजच्या युगात मोबाईलमुळे मुलांचे बालपण हिरावले जात आहे. त्यांच्या हातात मोबाईल ऐवजी पुस्तके द्या, वाचनाची आवड निर्माण होणारे साहित्याची निर्मितील झाली पाहिजे. वाचनाने माणुस समृद्ध तर होतोच पण भावविश्वाचा विकास होतो. कवितेमधून मुलांना निव्वळ आनंद मिळतो. ‘जो न देखे रवी ते देखे कवी’. सामाजिक, भावनिक, बुद्धीमत्ता जोपासण्याचे काम कवितेमधून होत असते. कविता भविष्य काळाचा वेध घेतात”, असे प्रतिपादन राज्याचे शिक्षण सहसंचालक रमाकांत काठमोरे यांनी केले.
नगरमधील वसंत टेकडी येथील डॉ. ना. ज. पाउलबुधे शैक्षणिक संकुलात राज्यस्तरीय बालकुमार कवी संमेलनाचे उद्घाटन शिक्षण सहसंचालक रमाकांत काठमोरे यांच्या हस्ते झाले. धोंडीरामसिंह राजपुत, रविंद्र कापरे, वाहतुक पोलीस उपनिरिक्षक शमुवेल गायकवाड, ज्येष्ठ साहित्यिक सुभाष सोनवणे, दादासाहेब भोईटे, रघुनाथ कारमपुरी, भाऊसाहेब कबाडी, प्रशांत वाघ, नितीन गायके, नानासाहेब जिवडे, दोस्ती फौंडेशनचे अध्यक्ष रज्जाक शेख, प्रकल्प प्रमुख देवीदास बुधवंत, मुख्याध्यापक भरत बिडवे, मुख्याध्यापिका अनिता सिद्दम, समाजसेवक नाना डोंगरे आदि उपस्थित होते.
रमाकांत काठमोरे यांनी विद्यार्थ्यांना मातृभाषेबद्दल आदर ठेवावा. मराठी भाषा आपली मातृभाषा आहे. मुलांनी आईच्या भाषेत शिकले पाहिजे, मुलांमधील भावविश्व उघडण्यासाठी हे कवी संमेलन असल्याने सर्वांनी मनातील घुसमट, भिती, आदर, आनंद यांना कवितेच्या माध्यमातून वाट मोकळी करुन द्यावी, असे सांगितले. अध्यक्षीय भाषणात धोंडीरामसिंह राजपूत यांनी मराठी फक्ता भाषा नसून आपली संस्कृती आहे. इतिहास कळात छत्रपती शिवाजी महाराजांनी राजभाष प्राकृत कराठी अधिकृत केली होती. आईच्या भाशेत जी मुलं शिकतात, तीच यशाची शिखर गाठतात, असे सांगितले.
या बालकुमार कवी संमेलनात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्याससह कर्नाटकमधील देखील बालकवींनी उपस्थित राहून कविता सादर केल्या. दोस्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष रज्जाक शेख यांनी मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, हे पालक-शिक्षकांना वाटते. ही वाचनाची आवड छोट-छोटया व आनंद देणार्या कविता, काव्यातून लवकर निर्माण होत असते. त्यामुळे हे बालकाव्य संमेलन मुलांसाठी पर्वणी ठरत आहे. या बालकाव्य संमेलनात मान्यवरांनी सादर केलेल्या बाल काव्यातून मुलांमध्ये साहित्य, कविता, पुस्तकांची गोडी लागेल, असा विश्वास व्यक्त केला.
संस्थेचे अध्यक्ष विनय पाउलबुधे यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले. सेवा शिक्षण प्रसारक संया संमेलनाचे आयोजन ग्रामीण कवी आनंदा साळवे, प्रा.संदिप कांबळे, प्रा.आशा गावडे, विजय विरकर, प्रांजली विरकर केले. दीपक परदेशी यांनी सूत्रसंचालन केले. देवीदास बुधवंत यांनी आभार मानले.