चर्चेत असलेला ‘आदिपुरूष’ चित्रपटाने प्रदर्शित हाेण्यापूर्वीच रेकाॅर्ड ताेडण्यास सुरूवात केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ‘आदिपुरूष’ने अॅडव्हान्स बुकिंगचे रेकाॅर्ड केले आहे. ‘KGF-2’ च्या नावावर अॅडव्हान्स बुकिंगचे रेकाॅर्ड हाेते. ते रेकाॅर्ड ‘आदिपुरूष’ चित्रपटाने ताेडला आहे.
‘आदिपुरूष’ चित्रपट प्रदर्शानापूर्वीच चर्चेत हाेता. ही फिल्म प्राेपगंडा असल्याचे काही सिनेतज्ज्ञ बाेलू लागले आहे. या फिल्मचा रामायण कथेशी निगडीत असलेल्या या चित्रपटात प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत अभिनेता प्रभास आहे. सीतामाईच्या भूमिकेत अभिनेत्री क्रिती सेनन आहे. रावणाचे पात्र अभिनेता सैफ अली खान याने निभावले आहे. अभिनेता प्रभास पेक्षा सैफ अली खान याने अभिनय चांगला केल्याचे काैतुक हाेत आहे. ‘आदिपुरूष’ ही फिल्म 16 जूनला प्रदर्शित हाेत आहे.
‘आदिपुरूष’चे अॅडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू झाले आहे. भारतात दहा जूनपासून खास ठिकाणाहून अॅडव्हान्स बुकिंग सुरू आहे. फिल्म प्रदर्शित हाेण्यापूर्वी अॅडव्हान्स बुकिंगचा रेकाॅर्ड ‘KGF-2’ च्या नावावर हाेता. ताे आता ‘आदिपुरूष’च्या नावावर झाला आहे. विशेष म्हणजे ‘आदिपुरूष’चे ‘KGF-2’ च्या अॅडव्हान्स बुकिंगच्या रेकाॅर्डपेक्षा पाच पट जास्त बुकिंग झाले आहे.
‘आदिपुरूष’ची न्यूझीलॅंड आणि ऑस्ट्रेलियामधील अॅडव्हान्स बुकिंगची कमाई 16 हजार डाॅलर एवढी आहे. भारतीय मूल्यामध्ये ती 13 लाख 19 हजार रुपये एवढी आहे. भारतात ‘आदिपुरूष’ सिनेमासाठी 6 हजार 200 ते 6 हजार 500 स्क्रिन मिळणार आहे. भारतातील हिंदी भाषिक पट्ट्यात चार हजार स्क्रिन मिळतील. तसेच साउथ इंडियामध्ये 2 हजार 200 ते 2 हजार 500 पर्यंत स्क्रिन मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
‘आदिपुरूष’ चित्रपटाचे प्रमाेशन जाेरात सुरू असून यासाठी सर्व स्टार कास्ट काम करत आहे. परंतु रावणाची भूमिका साकारत असलेला अभिनेता सैफ अली खान प्रमाेशनपासून दूर आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान, ‘आदिपुरूष’ चित्रपटासाठी अभिनेता रणवीर कपूरने अॅडव्हान्स दहा तिकीट खरेदी केली आहेत. ताे हा सिनेमा लहान मुलांना दाखवणार आहे.