Nagar BJP news : भाजप बुद्धिजीवी प्रकोष्टच्यातर्फे ‘नारीशक्ती सन्मान’ हा कार्यक्रम ऋग्वेद भवन येथे झाला. या कार्यक्रमात सामाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या आणि आपल्या कामाचा ठसा उमटविणाऱ्या नारीशक्तीचा सन्मान करण्यात आला. भाजप बुद्धिजीवी प्रकोष्टच्या संयोजिका स्मिता भुसे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
स्मिता भुसे म्हणाल्या, महिला दिन 365 दिवस साजरा व्हावा. महिला दिनी नोकरी, व्यवसाय सांभाळून परिवाराला पुढे नेणाऱ्या महिलांचा सन्मान होणे आवश्यक आहे. स्त्री-पुरुष दोघेही परस्पर पुरक असल्याने दोघांचाही सन्मान झाल्यास समाजाचा विकास होईल. आज समाजातील ज्या स्त्रियांना सन्मानित करण्यात आले, त्या सित्रीया खरोखरच दखलपात्र तर आहेच. त्याबरोबरच जिद्दीने परिश्रमपूर्वक यशस्वी आहे”. त्यांचा संघर्षमय प्रवास अत्यंत प्रतिकूलतेतून अनुकूलप्रद, कसा झाला, याची दखल घेऊन बुद्धिजीवी प्रकोष्ठ यांनी सामन्यातील असामान्य कर्तृत्व शोधून काढून त्यांना सन्मानित केले आहे. त्यांचा सन्मान हा इतरांसाठी प्रेरणादायी राहील, असेही स्मिता भुसे म्हणाल्या.
नगर शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी स्त्री म्हणजे शक्तीचे स्त्रोत आहे. प्रतिकुल परिस्थितीतून आपल्या कुटूंबाला पुढे नेण्यात त्यांचा मोठा हातभार आहे. आजच्या स्त्री सन्मानात यासर्व भगिनींचा विधि क्षेत्रातील कामे पाहून, संघर्षाची दखल घेत भाजप बुद्धिजीव प्रकोष्टच्यावतीने खर्या अर्थाने त्यांच्या कार्याचा गौरव केला असल्याचे सांगितले.
सविताताई काळे (मुकबधीर व दिव्यांगांसाठीचे कार्य), वर्षा जोशी (जमीन खरेदी व्यवहार पारंगत), निलिमा खरारे (कॅब ड्रायव्हींग), मंगला पोतदार (खाद्य पदार्थ व्यवसाय), शैला तांबे (समाजसेविका), अरुणा वाघ (समाजसेविका), जयश्री सूळ (महिलांसाठी सरकारी योजनांचा कॅम्प) या महिलांना सन्मानित करण्यात आला.
नगर शहर जिल्हाध्यक्ष अॅड.अभय आगरकर, सरचिटणीस सचिन पारखी, प्रशांत मुथा, महेश नामदे, प्रदेश चिटणीस गीता गिल्डा,महिला मोर्चा अध्यक्षा प्रिया जानवे, चिटणीस गोपाल वर्मा, अनिल निकम, नितीन शेलार, पप्पू गर्जे, बंटी डापसे, अनिल सबलोक, बाळासाहेब भुजबळ, ज्योती दांडगे, राखी आहेर, कालिंदी केसकर, निता फाटक, सुरेखा जंगम, रेखाताई मैड, सर्व बुद्धिजीवी प्रकोष्ट पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. राधिका ऋषी व हेमलता पाटील यांनी सन्मानमूर्ती यांच्या कार्याचा परिचय करुन दिला. भाजप बुद्धिजीवी प्रकोष्ठचे सुनील जडे, सुदर्शन कुलकर्णी, कीर्ती बेलेकर, निखिल रसाळ यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. भारती कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. भावना वैकर यांनी आभार मानले.