पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. पीएम ई-बस सेवा आणि विश्वकर्म याेजनेला या बैठकीत मंजुरी देण्यात आली. पीएम ई-बस सेवेला 57 हजार 613 काेटी रुपये खर्च असणार आहे. देशभरात सुमारे दहा हजार नवीन इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध हाेणार आहे. यासाठी 57 हजार 613 काेटींपैकी 20 हजार काेटी रुपये केंद्र सरकार देणार आहे.
या याेजनेत तीन लाख आणि त्याहून अधिक लाेकसंख्या असलेल्या शहरांचा समावेश करण्यात आला आहे. या याेजनेअंतर्गत सार्वजनिक खासगी भागीदारी माॅडेलवर दहा हजार ई-बससह संचालन केले जाणार आहे. ही याेजना 10 वर्षांसाठी बस चालवण्यास मदत करेल, असेही अनुराग ठाकूर म्हणाले. म्हणजेच 169 शहरांमध्ये दहा हजार ई-बस तैनात केल्या जाणार आहेत.
केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पंतप्रधान माेदींनी स्वातंत्रदिनाच्या भाषणात कारागिरांसाठी विश्वकर्मा याेजनेची घाेषणा केली हाेती. मंत्रिमंडळाने 13 काेटी रुपयांच्या विश्वकर्मा याेजनेला मंजुरी दिली आहे. कारागिरांना एक लाख रुपयापर्यंत कर्ज पाच टक्के दराने दिले जाणार आहे. विश्वकर्मा याेजनेचा 30 लाख कारागिर कुटुंबांना फायदा हाेणार आहे. यामध्ये लाेहार, कुंभार, गवंडी, धाेबी, सुतार, फुलकाम करणारे, मासे विणणारे, कुलूप, शिल्पकार इत्यादींचा यात समावेश असणार असून, त्यांना या याेजनेचा फायदा हाेणार आहे.