अभिनेता अनिल कपूर आणि आदित्य राॅय कपूर यांची मुख्य भूमिका असलेली ‘द नाईट मॅनेजर’ या वेब सीरीजच्या दुसऱ्या सीझनचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या वेब सीरिजच्या पहिला सीझनमुळे प्रक्षेकांची उत्कंठा वाढली आहे.
‘द नाईट मॅनेजर’च्या पहिल्या सीझनची कथा अत्यंत रंजक असून इंग्लिश वेब सीरिजचा रिमेक आहे. ट्रेलरमध्ये दाखवलेल्या कथेने आणि दृश्यांनी प्रेक्षकांची उत्कंठता अधिक वाढली आहे. त्यामुळे वेब सीरिजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
‘द नाईट मॅनेरज 2’ चा ट्रेलर हा एक मिनिट 59 सेकंदांचा आहे. आदित्य राॅय कपूर सिक्रेट एजंट बनून अनिल कपूरची फसवणूक करत आहे. नवीन सीझनमध्ये आदित्य राॅय कपूर अभिनेत्री शाेभिता धूलिपाला मदत करताना दिसणार आहे.
शोभिता ही या सीरिजमध्ये अनिल कपूरच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. शोभिता आणि आदित्य या नव्या सीझनमध्ये अनिल कपूरचे गैरव्यवहार उघडीस आणण्यासाठी वेगवेगळ्या खेळी खेळणार आहेत. यातच अनिल कपूरचा संशय बळावताे आहे. आदित्य आणि शाेभिता विषय संशय असल्याचे ट्रेलरमध्ये दिसत आहे. त्यामुळे नेमके काय घडणार याची उत्सुकता प्रेक्षकांना वाटते.
ट्रेलरमध्ये ॲक्शन सीन्स दिसत आहेत. तसेच आदित्य राॅय कपूर आणि शाेभिताचा इंटिमेट सीन देखील आहे. या दाेघांच्या सीन सध्या चर्चेत आहेत. गेल्या सीझनमध्ये दाेघांचे अफेअर असल्याची हिंट देण्यात आली हाेती. यातच अनिल कपूरला दाेघांविषयी संशय आल्याने नव्या सीझनमध्ये काय घडतेय, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. ‘द नाईट मॅनेजर’चा दुसरा भाग 30 जूनला प्रदर्शित हाेणार आहे.