MLA Jitendra Awad ः मुंबईतील मुंब्रा येथे काँग्रेसचे राहुल गांधी यांच्या सभेमध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांना निळा पंचा घालत असताना फेकून देण्यात आला. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्यावतीने मार्केट यार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कृतीचा निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच वादग्रस्त आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हा अध्यक्ष सुरेश बनसोडे आणि महिला अध्यक्ष साधना बोरुडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. आंदोलनात अंकुश मोहिते, राष्ट्रवादी युवकचे वैभव ढाकणे, समीर भिंगारदिवे, सुभाष वाघमारे, सागर विधाते, विशाल बेलपवार, वीर चव्हाण, बाबा कदम, ऋषी विधाते, ओम भिंगारदिवे, आनंद ठोंबरे, बबलू भिंगारदिवे, सुजल विधाते, विकी साठे, सिद्धांत विधाते, मयूर विधाते, गौरव विधाते, प्रशांत लोखंडे, कुणाल म्हस्के, गांधी विधाते उपस्थित होते.
सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे म्हणाले, “नेहमीच आपल्या बेताल वक्तव्य करून राज्यात शांतता भंग होणार असे वक्तव्य करणारे वादग्रस्त आमदार जितेंद्र आव्हाड यांनी निळा पंचा फेकून दिला. कार्यकर्त्यांना अरेरावीची भाषा केली. त्यामुळे समस्त भीमप्रेमीच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याने राष्ट्रवादी अजितदादा पवार गट व आमदार संग्राम जगताप यांच्यावतीने आव्हाड यांचा निषेध करतो. जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी समस्त आंबेडकरी जनतेच्या वतीने करत असल्याचेही सुरेश बनसोडे यांनी म्हटले.