Ahmednagar Police ः संगमनेर शहरामध्ये गोवंशीय जनावराची कत्तलीच्या उद्देशान आणलेल्या तिघांविरोधात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी कारवाई केली. या तिघांकडून २० लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली. रैय्यान शेरखान पठाण (वय 21, रा. रहेमतनगर, जोर्वे रोड, संगमनेर), सलमान हारुन मणियार (वय 34, रा. मोमीनपुरा, छोटी मशिदजवळ, संगमनेर) आणि राझिक अब्दुल रज्जाक शेख (वय 38, रा. अलकानगर, दिल्ली नाका, संगमनेर) या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अवैध धंद्याची माहिती काढत असतांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला संगमनेरमधील जमजम कॉलनी या ठिकाणी गोवंश जातीचे जिवंत जनावरे कत्तल करण्याचे उद्देशाने आणून ठेवल्याची माहिती मिळाली. पथकाने रात्री सव्वा दोन वाजता खात्री करत तेथून तिघांना ताब्यात घेतले. या तिघांनी दोन पिकअपमध्ये कत्तल केलेले जनावरांचे मांस भरले होते. रैय्यान शेरखान पठाण (वय 21, रा. रहेमतनगर, जोर्वे रोड, संगमनेर), सलमान हारुन मणियार (वय 34, रा. मोमीनपुरा, छोटी मशिदजवळ, संगमनेर) आणि राझिक अब्दुल रज्जाक शेख (वय 38, रा. अलकानगर, दिल्ली नाका, संगमनेर) या तिघांना ताब्यात घेतले.
या तिघांकडून पहिल्या 6 लाख रुपयांचा पिकअप आणि त्यामध्ये साडेचार लाख रुपये किमतीचे 1500 किलो गोमांस, दुसर्या सहा लाख रुपयांच्या पिकअप आणि त्यामध्ये 1400 किलो गोमांस आढळले. दोन हजार रुपये किमतीचा सत्तुर, दोन सुरे व एक कुऱ्हाड, असा एकुण 20 लाख 72 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
पोलीस कर्मचारी सचिन दत्तात्रय अडबल यांच्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला, अतिरीक्त पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस अंमलदार सचिन अडबल, बापूसाहेब फोलाणे, गणेश भिंगारदे, संतोष लोढे, अतुल लोटके, संतोष खैरे, रणजित जाधव, रविंद्र घुंगासे, सागर ससाणे, बाळासाहेब गुंजाळ, आकाश काळे, विशाल तनपुरे, उमाकांत गावडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.