TDF teachers meet ः शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) चा जिल्हा उद्बोधन मेळावा तब्बल २२ वर्षानंतर नगर शहरात पार पडला. टीडीएफ नेत्या लता डांगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यात सर्व शिक्षकांसमोर जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. टीडीएफ जिल्हाध्यक्षपदी एम.एस. लगड, सचिवपदी मुस्ताक सय्यद तर शहर जिल्हाध्यक्षपदी दादासाहेब वांढेकर, शहर सचिवपदी तौसिफ शेख व शहर उपाध्यक्षपदी वैभव सांगळे यांची नियुक्ती करण्यात आली.
टीडीएफचा शिक्षक मेळावा गेल्या २२ वर्षात कधीही झाला नसल्याची खंत अनेक शिक्षकांनी मेळाव्यात व्यक्त केली. राज्य व जिल्हा कार्यकारिणीची निवड लोकशाहीपद्धतीने झाली नसून, यापूर्वी सर्व निवडी बंद खोलीतच करण्यात आल्याचा रोष व्यक्त केला. बैठकीत लोकशाहीपद्धतीने शिक्षक लोकशाही आघाडीची कार्यकारिणीची निवड करावी, असा आग्रह सर्व सभागृहाने लावून धरला. सर्व शिक्षकांच्या भावनांची दखल घेत सभेच्या अध्यक्षा लता डांगे यांनी नूतन कार्यकारिणीची निवड करण्याचे सुचवले.
सावेडीत झालेल्या मेळाव्यात नवीन कार्यकारिणी निवडीसाठी कमिटी स्थापन करून निवडीचे सर्व अधिकार कमिटीला देण्यात आले. कमिटीमध्ये चांगदेव कडू, बाजीराव कोरडे, आप्पासाहेब शिंदे, ज्ञानदेव नालकर, रामनाथ सुरवसे, मारुती लांडगे यांचा समावेश होता. या कमिटीने तरुण व कार्यरत शिक्षकांना सर्व जिल्ह्यातून स्थान दिले. कमिटीने निवडलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्व सभागृहाने स्वागत केले. आप्पासाहेब शिंदे यांनी नवीन कमिटीतील पदाधिकाऱ्यांच्या नावाची घोषणा केली.
चांगदेव कडू यांनी तरुण पिढीला टीडीएफच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आला आहे. लोकशाही मार्गाने शिक्षक लोकशाही आघाडीची रचना करण्यात आली असून, एकजुटीमुळे आपल्या विचारांचा प्रतिनिधित्व करणारा प्रतिनिधी विधानपरिषदेत जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. बाजीराव कोरडे यांनी टीडीएफचा सर्व इतिहास, ध्येय, धोरणे, राज्य व जिल्हा कार्यकारिणी यांच्या निवडीचा इतिहास सर्वांसमोर मांडला. यावेळी कौन्सिल सदस्यांची निवड करण्यात आली.
शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) कार्यकारिणी
जिल्हाध्यक्ष- एम.एस. लगड (श्रीगोंदा), उपाध्यक्ष- साहेबराव रट्टे (श्रीरामपूर), सुनील दानवे (नेवासे), अमोल ठाणगे (पारनेर), देविदास पालवे (पाथर्डी), राज गवांदे (अकोले), सचिव- मुस्ताक सय्यद (संगमनेर), सहसचिव- दीपक दरेकर (अहमदनगर), प्रशांत खडतकर (कोपरगाव), संजय रोकडे (राहुरी), सुरेश भोईटे (कर्जत), गाढवे ताराचंद (जामखेड), खजिनदार- गोरख निर्मळ (राहता), हिशोब तपासणीस- रमेश लांडे (शेवगाव), कौन्सिल सदस्य-विठ्ठलराव पानसरे, चांगदेव कडू, राजेंद्र कोतकर, महेंद्र हिंगे, राजेश महानवर, राजेंद्र गोसावी, आप्पासाहेब शिंदे, राजेंद्र खेडकर, शिवाजी तापकीर, ज्ञानदेव नालकर, रामनाथ सुरवसे, बाजीराव कोरडे, नंदकुमार शितोळे, लताताई डांगे, फारुक सय्यद, गजानन शेटे, हरिश्चंद्र नलगे, शिवाजी हरिश्चंद्रे, छबुराव फुंदे, रमेश गायकवाड, संदीप बांगर, संभाजी गाडे, बाबासाहेब गुंजाळ, शिवाजीराव आठरे, रमाकांत दरेकर, प्रशांत होन, विनोद कोरडे, उमेश गुंजाळ, भाऊसाहेब शिंदे, समाधान आराक, दीक्षा सोपान, सुभाष कडलग, माधवराव नागवडे, जनार्धन सुपेकर, दिगंबर पुराने, उद्धव गायकवाड.