The theft of the teacher’s jewellery ः एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिला शिक्षकाच्या पर्समधील ठेवलेले सोन्या व चांदीचे दागिने चोरीची घटना घडली आहे. पाथर्डीच्या शिरूर कासार येथील महिला शिक्षिका सुरेखा रामराव बडे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्ह्याची नोंद झाली आहे. सव्वा तीन लाख रुपयाचा ऐवज चोरी गेला आहे.
शिक्षिका सुरेखा बडे या बुलढाणा जिल्ह्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शिक्षिका म्हणून करत आहेत. शिरूर कासार (ता. पाथर्डी) या ठिकाणाहून पाथर्डीला एसटी बसणे येत होत्या. बसमध्ये गर्दी होती. सुरेखा बडे यांना बसमध्ये मागील सिटावर जागा मिळाली. सुरेखा बडे व त्यांचे नातेवाईक हे बसमध्ये मागील सिटवर बसले. सुरेखा यांच्या आई पुष्पा या पाठीमागून बॅग घेऊन येत असतांना, बसमध्ये उभे असलेले बायका म्हणाल्या की, तुमचे बॅगचा आम्हांला धक्का लागत आहे. तुम्ही तुमचे हातातील बँग येथे खाली ठेवा. यानुसार बॅग खाली ठेवली.
बॅग ही बसमध्ये पुढच्या सीटजवळ खाली ठेवली. सुरेखा बडे या बसमध्ये मागे बसल्या. यानंतर बॅग उपचलून ती बसचे कॅरियरवर ठेवली. सुरेखा या दुपारी बसमधून पाथर्डी येथे उतरल्या. त्यावेळी बॅगमध्ये असलेली दागिने ठेवलेली पर्स दिसली नाही. चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर सुरेखा यांनी पाथर्डी पोलिसांकडे धाव घेतली. साडेतीन तोळ्याचे सोन्याचे गंठण, छोटे दोन तोळ्याचे सोन्याचे गंठण, तीन तोळ्याची सोन्याची साखळी, सोन्याचे कर्णफुले एक तोळ्याचे, पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी, साडेतीन ग्रॅम चे सोन्याचे कर्णफुले, फॅन्सी साडेतीन ग्रॅमचे सोन्याचे कर्णफुले, एक ग्रॅमच्या कानातील सोन्याच्या बाळ्या, पाचशे मिलीची सोन्याची अंगठी, सोन्याचे खडे, चांदीचे चाळ, कडे आणि जोडवे या सोन्या चांदीच्या ऐवज चोरी गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.