अहमदनगर महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनावरील अरुढ पुतळा बसवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारी सायंकाळी ६ वाजता छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन होणार आहे. आमदार संग्राम जगताप व महापौर रोहिणी शेंडगे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. पंकज जावळे व उपमहापौर गणेश भोसले यांनी आज पाहणी केली.
उपमहापौर गणेश भोसले म्हणाले, “महापालिका प्रशासकीय इमारतीच्या आवारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनावरील आरूढ पुतळा बसवण्यासाठीच्या कामाचे भूमिपूजन भव्य दिव्य पद्धतीने हाेणार आहे”. शहरातील शिवप्रेमी व विविध संघटनांनी मोठ्या संख्येने उपस्थिती राहावे, असे आवाहनही उपमहापौर यांनी केले.
नगरसेवक मनोज कोतकर, नगरसेवक विनीत पाऊलबुधे, नगरसेवक प्रकाश भागानगरे, इंजि. श्रीकांत निंबाळकर, इंजि. मनोज पारखी, उद्यान प्रमुख शशिकांत नजन आदी उपस्थित होते.
