Close Menu
Kharee GoshtKharee Gosht
    What's Hot

    Nagar Urban Bank ः पोलिसांकडून निराशा आणि नाराजी…

    May 4, 2024

    Fraud ः डाॅ. भंडारी आणि डाॅ. गांधींनी केलाय 85 लाखांचा फ्राॅड

    May 4, 2024

    Lok Sabha Election Voter Awareness ः “मै तेरा-१३ मे” रिल्स बनवा स्पर्धा

    May 4, 2024
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • Nagar Urban Bank ः पोलिसांकडून निराशा आणि नाराजी…
    • Fraud ः डाॅ. भंडारी आणि डाॅ. गांधींनी केलाय 85 लाखांचा फ्राॅड
    • Lok Sabha Election Voter Awareness ः “मै तेरा-१३ मे” रिल्स बनवा स्पर्धा
    • Illegal moneylending ः महिलेची अवैध सावकारी, घरच नावावर करून घेतले
    • Rahuri News ः चोरांच्या हात की सफाईपासून सावध…
    • Pune University Vice Chancellor News ः विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी व मार्गदर्शनासाठी प्राधान्य
    • Ahmednagar News ः व्यावसायिकाची अशी झाली 98 लाखांची फसवणूक
    • Ahmednagar Lok Sabha Election 2024 ः देशातल्या पहिल्या स्वीप केअर व्हाट्सअप क्रमांक संकल्पनेचे कौतुक
    Kharee GoshtKharee Gosht
    Wednesday, July 9
    • Home
    • खरी गोष्ट
    • ताज्या बातम्या
    • महाराष्ट्र
    • शैक्षणिक
    • अर्थ
    • मनोरंजन
    Kharee GoshtKharee Gosht
    Home»शैक्षणिक

    शिक्षकांचा संताप, राज्य सरकारच्या निर्णयाची होळी

    Kharee GoshtBy Kharee GoshtSeptember 15, 2023 शैक्षणिक No Comments2 Mins Read
    Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook WhatsApp Twitter LinkedIn Pinterest Email

    शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेट बिगार करायला लावणाऱ्या 6 सप्टेंबरच्या शासन निर्णयाची महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने होळी केली. भावी पिढीचे भवितव्य उध्वस्त करणाऱ्या या शासन निर्णयाच्या विरोधात निदर्शने करुन, हा निर्णय मागे घेण्याची मागणी करण्यात आली.

    नियमित भरती करण्याऐवजी सरकारने बाह्य यंत्रणेकडून राज्यातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी भरण्याचे धोरण 6 सप्टेंबरच्या शासन निर्णयाद्वारे घेतले आहे. शिक्षक शिक्षकेतरावर हा अन्याय असून, राष्ट्र उभारणीचे काम करणाऱ्या शिक्षकांचे खासगीकरण, कंत्राटीकरण रद्द झाले पाहिजे. खासगीकरण व कंत्राटीकरणाचा 6 सप्टेंबरचे शासन निर्णय रद्द झाला नाही तर शिक्षक परिषदे राज्यभर तीव्र आंदोलन करेल, असा इशारा राज्याध्यक्ष प्रा. सुनिल पंडित आणि शहराध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांनी दिला. 

    राज्यातील शिक्षण विभागात सुमारे 1 लाख पदे रिक्त आहेत. 2012 पासून पद भरती झालेली नाही. संच मान्यतेचे निकष बदलून शासनाने यापूर्वीच राज्यातील शिक्षक पदांची संख्या कमी केली आहे. त्याचाच परिणाम म्हणून शिक्षक अतिरिक्त होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. राज्यात 6 लाखांपेक्षा जास्त डीएड पदवीधारक तरुण बेरोजगार आहेत. मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असताना भरती झालेली नाही. शिक्षण विभागात मोठी भरती होणार म्हणून टीईटी परीक्षा घेण्यात आली. अभियोग्यता चाचणी घेण्यात आली, विविध परीक्षांच्या नावाखाली कोट्यवधी रुपये परीक्षा शुल्क जमा करण्यात आले. परंतु भरती करण्यात आलेली नाही. सध्या मानधनावर भरती करण्याचा निर्णय घेऊन शासनाने लाखो सुशिक्षित बेरोजगार तरुणांचे भवितव्य वेशीवर टांगले असल्याचे शिक्षक परिषदेवतीने स्पष्ट करण्यात आले आहे. तर हा 6 सप्टेंबरचा शासन निर्णय त्वरीत रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

    या आंदोलनात शिक्षक परिषदेचे प्रांत सदस्य प्राचार्य सुनील सुसरे, नाशिक विभाग अध्यक्ष शरद दळवी, कार्यवाह शिवाजी घाडगे, कोषाध्यक्ष प्रसाद सामलेटी, अनिल आचार्य, किशोर अहिरे, बाबासाहेब ढगे, बबन शिंदे, प्रा. भरत बिडवे, मुख्याध्यापक मधुकर साबळे, अरविंद आचार्य, गजेंद्र गाडगीळ, गोविंद धर्माधिकारी, अजय महाजन, दीपक शिंदे, जयसुधा ताटी, वर्षा गुंडू, जयश्री घोडे, प्रसाद नंदे, सुजय रामदासी, बाळकृष्ण हराडे, मनेष हिरणवाळे, सुरेश खामकर आदी सहभागी झाले होते.

    Share. Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kharee Gosht

      Keep Reading

      Pune University Vice Chancellor News ः विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी व मार्गदर्शनासाठी प्राधान्य

      Sport in Ahmednagar ः जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत 300 खेळाडूंचा सहभाग

      New Arts College News ः प्राचार्य झावरे व प्रा. जावळे यांचा सेवापूर्ती गौरव

      Employment News ः रसायनशास्त्र विभागातील 20 विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड

      Rahuri News ः सावित्रीच्या लेकी क्रिकेटमध्ये राज्यात प्रथम

      Bhingar News ः पूजा वराडे व तुषार घाडगे यांचा गौरव

      Add A Comment
      Leave A Reply Cancel Reply

      Editors Picks

      Nagar Urban Bank ः पोलिसांकडून निराशा आणि नाराजी…

      May 4, 2024

      Fraud ः डाॅ. भंडारी आणि डाॅ. गांधींनी केलाय 85 लाखांचा फ्राॅड

      May 4, 2024

      Lok Sabha Election Voter Awareness ः “मै तेरा-१३ मे” रिल्स बनवा स्पर्धा

      May 4, 2024

      Illegal moneylending ः महिलेची अवैध सावकारी, घरच नावावर करून घेतले

      May 4, 2024
      Latest Posts
      © 2025 Kharee Gosht
      • Privacy Policy
      • Terms
      • Accessibility

      Type above and press Enter to search. Press Esc to cancel.