टाटा समूहाची कंपनीची एक खरेदी सध्या देशात चर्चेचा विषय ठरली आहे. टाटा समूहाची कंपनीने एअर इंडियाने माेठ्या प्रमाणात विमाने खरेदी करण्याची ऑर्डर दिली आहे. ही ऑर्डर प्रत्यक्षात ८४० विमानांची आहे. कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या माहितीला दुजाेरा दिला आहे. कंपनीने जगातील आघाडीच्या विमान उत्पादक एअरबस आणि बाेईंगला माेठी ऑर्डर दिली आहे. यात ३७० विमाने खरेदी करण्याचा पर्याय ठेवला आहे.
टाटा समूहाच्या एअरलाईन्सचे मुख्य अधिकारी निपुण अग्रवाल यांनी समाज माध्यमांवर पाेस्ट शेअर केली आहे. अग्रवाल म्हणाले, “एअर इंडियाची विमाने खरेदी करण्याची ऑर्डर ही भारतीय विमान वाहतूक उद्योगासाठी मैलाचा दगड ठरणारी आहे आणि जगभरात ज्या प्रकारचा उत्साह दिसून येत आहे, त्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत”. लिंक्डइन पोस्टमध्ये ऑर्डरचा तपशील देताना अग्रवाल यांनी लिहिले की, “४७० विमाने खरेदी करण्याच्या फर्म ऑर्डर व्यतिरिक्त, त्यात पुढील दशकात एअरबस आणि बोईंगकडून आणखी ३७० विमाने खरेदी करण्याचे पर्यायी अधिकार देखील समाविष्ट आहेत.”