टीव्हीवरील लोकप्रिय-शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ गेल्या अनेक दिवसांपासून उलट-सुलट विषयांनी चर्चेत आहे. एकीकडे अनेक कलाकारांनी शो सोडला आहे. त्या साेडलेल्या कलाकारांची दुसरे जागा घेत आहे. असे असताना दुसरीकडे प्रेक्षक अजूनही ‘दयाबेन’ दिशा वाकाणीच्या पुनरागमनाची वाट पाहत आहेत. काही महिन्यांपूर्वी, निर्मात्यांनी एका प्रोमोमध्ये दयाबेनच्या पुनरागमनाची झलकही दाखवली होती, ज्याने लोक उत्साहित झाले होते. मात्र आजतागायत ना दयाबेन परतल्या आहेत, ना ही व्यक्तिरेखा. अभिनेत्री दिशा वाकाणी परतणार की नाही याबाबत कोणतीही बातमी नाही. पण आता असित कुमार मोदींनी अखेर दिशा वाकानी म्हणजेच दयाबेनवर मौन सोडलं आहे.
तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये नुकताच एक नवीन टप्पू दाखल झाला. आधी राज अनाडकट ही व्यक्तिरेखा साकारत होता. पण आता त्याची जागा नितीश भुलानीने घेतली आहे. शोच्या नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत असित कुमार मोदी यांनी सगळ्यांना नवीन टप्पूची ओळख करून दिली. पण दयाबेनबद्दलही बोलले. ‘तारक मेहता’मध्ये जवळपास प्रत्येक पात्राची जागा घेण्यात आली आहे. पण दयाबेनची व्यक्तिरेखा तशीच आहे. ना तो बदलला आहे ना नवीन एंट्री झाली आहे. शोमध्ये दयाबेनची भूमिका करणारी दिशा वाकाणी परत येणार की तिलाही रिप्लेस केले जाणार, असा प्रश्न असित मोदींना विचारण्यात आला.त्यावर ते म्हणाले, “
उत्तर देणे थोडे कठीण आहे. आपण सर्वांनी आधीच ठरवले आहे, की जर दया भाभी म्हणजेच दिशा वाकानी आली तर आपल्याला खूप इच्छा आहे. मी देवाला एवढीच प्रार्थना करतो की त्यांनी या शोमध्ये हे पात्र करण्यासाठी परत यावे. आता तिला कौटुंबिक जीवन आहे आणि ती तिच्या कौटुंबिक जीवनाला प्राधान्य देत आहे. त्यामुळे तिचे येणे थोडे कठीण जात आहे. पण आता टप्पू आल्याने नवीन दया भाभीही लवकरच येणार आहे. दया भाभीचा तोच गरबा, दांडिया सर्व गोकुळ सोसायटीत सुरू होणार आहे. थोडा वेळ थांबा”.