साेलापूर जिल्ह्यातील माेडनिंब हे कला केंद्रातील कलावंतांच्या रहिवासासाठी प्रसिद्ध आहे. कलाकार, कला केंद्र मालक आणि विविध विभागाशी संबंधित कलाकारांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. तसेच सर्वात माेठा निर्णय झाला. ताे म्हणजे, यापुढे 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींना कलाकार म्हणून सहभागी करून घेऊ नये, असा हा महत्त्वपूर्ण निर्णय झाला.
मुलीचे शिक्षण आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे बैठकीनंतर सांगण्यात आले. 18 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या मुली हा सुजाण असतात. त्यांना चांगल्या-वाईटाची समज असते. त्यांना चागले वाईट समजत असते. मुलींच्या उज्ज्वल भवितव्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.
नृत्यांगणा गाैतमी पाटील हिचे अनेक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल हाेतात. नृत्य सादर करताना ती लहान मुलांच्या गालावर किस करते, असे देखील व्हिडिओ व्हायरल हाेताना दिसतात. या प्रकारावर देखील बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. लहान मुलांसाेबत असे कृत्य केल्यामुळे अनेक प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केलीय. तसेच गाैतमीचे हावभाव हे देखील चर्चेचे आणि टिकेचे कारण ठरले. त्यामुळे तमाशा कलावंतांनी याबाबत सावध भूमिका घेतली आहे. लहान मुलांचा किंवा मुलींचा मंचावर वावर नकाे, असा निर्णय कलाकारांनी या बैठकीत घेतला आहे.
तसेच तमाशा फडात आता डिजेवर बंदी असणार आहे. तसा निर्णय या बैठकीत झाला आहे. तमाशा ही पारंपरिक कला पद्धत आहे. या कलेत डिजेचा वापर केल्याने ती नष्ट हाेईल. तसेच काहीजणांनी ही गोष्ट म्हणजे कलंक असल्याचे म्हटले आहे. तमाशाचे पावित्र्य जपून राहावे यासाठी डिजेवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला नृत्यांगणा गौतमी पाटील हिने देखील पाठिंबा दिल्याची माहिती समाेर येत आहे.