अहमदनगर जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालय युवक महोत्सवाचे आयोजन अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय संगमनेर इथं करण्यात आले हाेते. वैयक्तिक सुगम गीत, भारतीय स्वर व ताल वाद्य वादन, भारतीय समूह गायन, भारतीय शास्त्रीय, उपशास्त्रीय गायन, पश्चिमात्य वैयक्तिक गीत आणि लोक वाद्यवृंद, वैयक्तिक नृत्य, लोकनृत्य आणि शास्त्रीय नृत्य एकपात्री अभिनय आणि नकला, प्रश्नमंजुषा, वक्तृत्व, वादविवाद स्पर्धा, एकांकिका प्रसहन, मूक नाटक, मूकनाटक, स्थळ चित्र आणि चिकट कला, कात्रण कला, पोस्टर मेकिंग आणि व्यंगचित्र, मेहंदी, रांगोळी, माती कला, स्थळ छायाचित्र आणि मांडणी कला या कला प्रकाराचा समावेश होता.
अहमदनगर महाविद्यालयातील संघाने मेंहदी स्पर्धेत- वैष्णवी बाबासाहेब गिर्हे, वादविवाद स्पर्धेत- प्रतीक्षा भिंगारदिवे, पुजा फुंडे, चित्रकला स्पर्धेत- पुजा फुंडे यांनी सहभाग नोंदवला, तर प्रश्नमंजुषा या प्रकारामध्ये तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. त्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जे, बार्नबास यांच्या हस्ते पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्या स्पर्धकांचे नाव- मनीष कुमार पांडे (एमए भूगोल प्रथम वर्ष), आकाश पन्नवर (एमए अर्थशास्त्र द्वितीय वर्ष), आरती नागरगोजे (एमकॉम द्वितीय वर्ष) आहे.
उपप्राचार्य प्रा. दिलीपकुमार भालसिंग, विनाअनुदान विभागाचे समन्वयक प्रा. डॉ . सय्यद रझ्झाक, प्रा. डॉ. सचिन मोरे, सांस्कृतिक समन्वयक आणि प्रा. डॉ. भागवत परकाळ, उपप्राचार्य प्रो. प्रितमकुमार बेदरकर, उपप्राचार्य प्रा. डॉ. नोयाल पारगे आणि रजिस्टर दीपक अल्हाट यांचे मार्गदर्शन लाभले.