Subsidy :मत्स्यपालन संपदा याेजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून माेठं अनुदान मिळत आहे. याचा मत्स्य शेती करणाऱ्यांना चांगला फायदा हाेणार आहे. या याेजनेत राज्य सरकारचेही याेगदान असणार आहे. राज्यात मत्स्यपालन घटकांना प्रधानमंत्री मत्स्य संपदा याेजनेतून अनुदान मिळते.
प्रधानमंत्री मत्स्य संपदा याेजनेअंतर्गत २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात भाडेतत्त्वावर घेतलेल्या जमिनीवर मत्स्यपालन करणाऱ्यांना २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. लाभार्थ्यांना गाेड्या पाण्यातील मत्स्यशेतीसाठी तलाव बांधणे, क्षारमुक्त आणि क्षारयुक्त जमीन तलाव बांधणे, आरएएस युनिटची स्थापना, दाेन, तीन आणि वीस टन प्रतिदिन उत्पादन क्षमता असलेले खाद्य भाेजन, घरामागील मिनी आरएएस यासाठी अनुदान दिले जाणार आहे.
