Rangotsav 2024 ः महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (MSCERT) पुणे येथे 18 ते 19 मार्च दरम्यान झालेल्या रंगोत्सव 2024 कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मठपिंप्री (ता. नगर) एकूण आठ विद्यार्थी आणि शिक्षक-शिक्षिका उत्कृष्ट सादरीकरण केले. परिषदेच्या परिक्षकासह राज्य भरतील उपस्थित शिक्षकांची व अधिकाऱ्यांसह सर्वांची मन जिंकली. नगर मधील एका छोट्याशा गावातून आलेल्या या विद्यार्थ्यांनी ‘कला समावेशित शिक्षण’ च्या माध्यमातून उत्तम कामगिरी करून राज्यस्तरीय रंगोत्सवामध्ये अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले.
कला समावेशित शिक्षण, कृतीयुक्त शिक्षणावर आधारित राज्यातील सर्वोत्तम पाठ सादरीकरण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या महात्मा फुले सभागृहात आयोजित करण्यात आले होते. त्यात राज्यभरातून जवळजवळ वीस शाळांची सादरीकरण झाले. ” कला समावेशित शिक्षणाचे महत्त्व नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात ही नमूद करण्यात आले आहे. त्याला अनुसरून शाळेत भाषा, इतिहास, परिसर अभ्यास, गणित सारख्या विषयात कलेच्या माध्यमातून अध्ययन अध्यापन केले जाते. नृत्य, नाट्य, संगीत, चित्रकला या कलांच्या माध्यमातून दिलेले शिक्षण विद्यार्थ्यांना चिरकाल टिकणारे असते, असे मार्गदर्शक शिक्षक श्रीनिवास एल्लाराम म्हणाले.
“छोट्याशा वस्तीतील विद्यार्थ्यांना जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची व राज्यावर सादरीकरण करण्याची मिळालेली संधी ही अविस्मरणीय आहे. आमच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी या संधीचे सोने करताना पाठाचे बहारदार सादरीकरण केले. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि कौतुक, असे शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब कापसे व व्यवस्थापन समिती अध्यक्ष म्हणाले.
या स्पर्धेत समर्थ गणेश शेंडगे, हर्षवर्धन परसराम शिंदे, जयदीप शंकर माळी, सोनाक्षी सर्जेराव बोरकर, प्रीतम निलेश बोरकर, दुर्वा कैलास बोरकर, समिक्षा दादा वाळके, देवेंद्र किरण काळोखे हे विद्यार्थी सहभागी झाले. मार्गदर्शक शिक्षक श्रीनिवास एल्लाराम व सुनिता गोलवड, मुख्याध्यापक बाळासाहेब कापसे, केंद्रप्रमुख मंदा माने, गटशिक्षणाधिकारी बाबुराव जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. शाळा व्यवस्थापन समितीचे शरद बोरकर, कैलास बोरकर, सर्जेराव बोरकर, स्वाती शेंडगे यांनी सहकार्य केले.