शेती म्हटले की आपल्यासमाेर गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, फळे, फुले, भाजीपाला यांनी भरलेले शेत समाेर येते. परंतु सापांची शेती म्हटल्यावर अंगावर काढा आल्याशिवाय राहणार नाही. व्हिएतनाममधील डाेंग टॅंममध्ये सापांची शेती केली जाते. ही शेती पाहण्यासाठी जगभरातील लाेक तिथं येत आहेत.
व्हिएतनामच्या त्या गावांमध्ये सापांची शेती, तिथे शेतातून सापांचे उत्पादन घेतले जाते. या शेत बगीचेमध्ये औषधांसाठी साप पाळले जातात. त्यांचे माेठ्या प्रमाणावर संगाेपन केले जाते. या सापांचे विष काढून त्यापासून प्रतिजैविके तयार केली जातात.
ही सापांची शेती पाहण्यासाठी जगभरातून तब्बल सात लाख लाेक व्हिएतनाममधील डाेंग टॅम फ्रेमला भेट देतात. या सापांच्या शेतीचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल हाेत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे स्थळ आता पर्यटनस्थळ हाेऊ झाले आहे. 12 हेक्टरमध्ये पसरलेल्या त्या शेतात वेगवेगळ्या जातींचे साप आहेत. या सापांच्या विषांपासून लसीची निर्मिती केली जाते. दुर्धर आजारांसाठी लागणारी प्रतिजैविके तयार केली जातात. त्यामुळे या सापांच्या शेतीचे महत्त्व वाढले आहे.