Corona : काेराेना महामारीचे साईट इफेक्ट आजही समाेर येत आहेत. काेराेनाने दीर्घकाळ प्रभावित असलेल्यांना आजही इतर आजारांचा धाेका अधिक आहे. मेंदूचे आजारासह अगदी केस गळण्यापर्यंतच्या समस्या समाेर येत आहेत. आराेग्यतज्ज्ञांना न्यूयाॅर्कमध्ये असेच एक प्रकरण आढळले आहेत. ज्यामध्ये मरण पावलेल्या व्यक्तीचा मृत्यू काेराेना संसर्गामुळे निर्माण झालेल्या प्रियन राेग या मेंदूसंदर्भातील आजारामुळे झाल्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे.
न्यूयाॅर्कमधील या व्यक्तीला मेंदूला प्रियन राेगाचा संसर्ग झाला हाेता. काेराेनामुळे हा संसर्ग झाल्याची शक्यता आराेग्यतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भातील एक अहवाल अमेरिकेतील जर्नल आॅफ केस या नियतकालिकामध्ये छापण्यात आला आहे. हा अहवाल तपशीलशीर आहे. या आजारामुळे व्यक्तीचे चालताना संतुलन बिघडणे, स्मृतीभ्रंशसारखे त्रास जाणवू शकतात. त्याला न्यूयाॅर्कमधील माऊंड सिनाई क्विन्स हाॅस्पिटल सेंटरमध्ये दाखल करण्यात आले हाेते. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या व्यक्तीच्या मेंदूचा एमआरआय करण्यात आला आहे. त्यात ठेस काही समजले नाही. यानंतर व्यक्तीची सीएसएफ प्राेटीन 14-3-3 चाचणी करण्यात आली. यात ही व्यक्ती बराच काळ काेराेना पाॅझिटीव्ह हाेती. त्यामुळे तिच्या मज्जासंस्थेवर परिणाम झाला. या रुग्णाची प्रकृती खालावत गेली आणि त्यानंतर तिचा मृत्यू झाला. हे प्रकरण न्यूराेडीजेनेरेटिव्ह आणि खास करून प्रियन डिसीज संदर्भातले निघाले. काेराेना संसर्गामुळे रुग्णाला प्रकृतीसंदर्भातील अनेक समस्या निर्माण झाल्या हाेता. त्याचा परिणाम त्याच्या प्रकृतीवर झाला हाेता, असे अहवालात म्हटले आहे.