दिग्दर्शक ओम राऊत यांचा ‘आदिपुरूष’ हा चित्रपटाची सध्या चर्चा आहे. श्रीरामाच्या भूमिकेत अभिनेता प्रभास, तर सीतामाईच्या भूमिकेत अभिनेत्री क्रिती सेनन आहे. हा चित्रपट चित्रकरण सुरू झाल्यापासून चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमाेशनसाठी आणि यशासाठी दिग्दर्शक ओम राऊत प्रयत्नशील आहे. यातून ते धार्मिक स्थळांना देखील भेट देत दर्शन घेत आहेत. परंतु चित्रपटातील अतिरंजकपणावर सुरूवातीपासून टीका हाेत आहे. आता प्रमाेशनवेळी देखील दिग्दर्शक चुका करत असल्याने हा क्रिती सेनन आणि दिग्दर्शक ओम राऊत यांची कृती चर्चेत आली आहे. यावर टीव्हीवरील ‘रामायण’ मालिकेत सीतेची भूमिका करणारी अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी टीका केली आहे. त्यामुळे क्रिती सेनन आणि ओम राऊत यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
ओम राऊत आणि क्रिती सेनन ‘आदिपुरूष’ चित्रपटाच्या प्रमाेशनसाठी एका धार्मिक स्थळी पाेहाेचले हाेते. तेव्हा त्यांनी गुडबाय किससाठी एकमेकांना मिठी मारली. तसा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. यावरून ओम राऊत आणि क्रिती सेनन चांगलेच ट्राेल झाले आहेत. हिंदू संघटनांमध्ये देखील यावर कृतीवर नाराजी पसरली आहे. टेलिव्हिजनवर प्रचंड गाजलेल्या ‘रामायण’ मालिकेतील अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी देखील क्रिती सेनन यांच्या कृतीवर नाराजी व्यक्त केली आहे. ”आजकालच्या कलाकारांचा प्राॅब्लेमच आहे. ते आपलं पात्रत जगतच नाही. त्यातील भावना समजूनच घेत नाही. क्रिती नव्या पिढीची अभिनेत्री आहे. आजकाल किस आणि मिठी मारणं खूपच काॅमन झालं आहे. तिने कधी स्वतःला सीता समजलंच नाही. ही प्रत्येकाची भावना असते. मी सीतेचं पात्र जगले आहे, तर आजकालच्या अभिनेत्री केवळ एक काम म्हणून त्याकडे बघतात. फिल्म पूर्ण झाली की त्यांना काही फरक पडत नाही”.
”आमच्यावेळी सेटवर आमचं नाव घेण्याची काेणाची हिमंत नव्हती. मी जेव्हा सीतेची भूमिका साकारत हाेते, तेव्हा सेटवरील अनेक लाेक येऊन पाया पडायचे. ताे काळच वेगळ हाेता. तेव्हा आम्हा कलाकार नाही, तर देवच समजायचे. आम्ही काेणाल किस करणं दूरच मिठीही मारत नव्हताे. ‘आदिपुरुष’चे कलाकार या प्राेजेक्ट नंतर दुसऱ्या प्राेजेक्टमध्ये व्यस्त हाेतील. या पात्रांना ते विसरून जातील. आम्हीला लाेक देवच समजत हाेते. त्यामुळे लाेकांच्या भावना दुखतील, असे कधीही वागलाे नाही”, असेही दीपिका चिखलिया यांनी म्हटले आहे.