शरद पवार यांनी अजित पवार यांच्या स्वगृही परतण्यावर माेठे भाष्य केले आहे. “काही जण वेगळी भूमिका घेतात. आपल्यातील काहींनी घेतली आहे. पण आज ना उद्या परिस्थिती लक्षात आल्यानंतर त्यांच्यात देखील बदल हाेईल. त्यांनी काेतीही भूमिका घेतली तरी आपण आपल्या मार्गावर ठाम राहिले पाहिजे. यात काेणताही संभ्रम नाही आणि कार्यकर्त्यांनी देखील संभ्रमात राहू नये”, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
शरद पवार यांनी पुरंदर तालुक्यातील एका शिष्टमंडळाशी संवाद साधताना अजित पवार पुन्हा स्वगृही परतण्यासंबंधीचे सूचक विधान केले. यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शरद पवार म्हणाले, “पक्षातील काही जणांनी वेगळी भूमिका घेतली आहे. त्यांना लवकरच परिस्थिती लक्षात येईल. आज ना उद्या त्यांच्यातही उद्या बदल हाेईल”. शरद पवार यांच्या या विधानामुळे अजित पवार पुन्हा स्वगृही परतणार काय? अशी चर्चा सुरू झाली आहे.
शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शनिवारी पुण्यात बैठक झाली. या बैठकीनंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली हाेती. यानंतर शरद पवार यांनी नात्यांची भेट असल्याचे सांगितले. यानंतर दुसऱ्याच दिवशी पवारांनी पुरंदर तालुक्यातील एका शिष्टमंडळाशी संवाद साधताना अजित पवार पुन्हा स्वगृही परतण्यासंबंधीचे सूचक विधान केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
सत्ता येते आणि जाते. पण सामान्यांना दिलेला शब्द साेडायचा नाही. अनेक जण मला विचारतात आता कसे हाेणार? पण आपण आपला मार्ग साेडायचा नाही. विचार केव्हाही साेडायचा नाही, हे लक्षात घ्या, असे शरद पवार यांनी म्हटले.