दिल्ली इथं होणाऱ्या थलसैनिक कँम्पसाठी अहमदनगरच्या पेमराज सारडा महाविद्यालयाच्या NCCच्या दाेन छात्रांची निवड झाली आहे. महाविद्यालयाचे सिनिअर अंडर ऑफिसर प्रशांत भांडकोळी आणि कॅडेट अक्षय निकम यांची निवड महाराष्ट्राच्या संघात झाली. याबद्दल सारडा विद्यालयाच्या प्राचार्य डॉ. माहेश्वरी गावित यांनी दोन्ही छात्रांचा सत्कार करून काैतुक केले. या दोन्ही छात्रांना महाविद्यालयाचे NCC विभागप्रमुख कॅप्टन अंकुश आवारे यांचे मार्गदर्शन लाभले.
प्राचार्य डॉ.माहेश्वरी गावित म्हणाल्या, “पेमराज सारडा महाविद्यालयातील दोन NCC छात्रांचा एकाच वेळी महाराष्ट्राच्या संघात सामावेश होणे ही महाविद्यालयाच्या दृष्टीने मोठी अभिमानाची गोष्ट आहे. महाविद्यालयाचे NCC विभागप्रमुख कॅप्टन अंकुश आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली छात्र उत्कृष्ट सर्व करत महाविद्यालयाचे नावलौकिक वाढवत आहेत”. नवी दिल्ली इथं होणाऱ्या अखिल भारतीय पातळीवरील स्पर्धेत दोन्ही छात्र चांगले यश मिळवतील अशा शुभेच्छा त्यांनी देवून दोन्ही छात्रांचा सत्कार केला.
कॅप्टन अंकुश आवारे म्हणाले, “NCC मध्ये थलसैनिक कँम्पमध्ये निवड होणे हे अत्यंत अवघड आणि आव्हानात्मक असते. या कँम्पसाठी संपूर्ण राज्यातील NCC छात्रांमधून महाराष्ट्राच्या संघासाठी निवड होत असते. ऑप्स्टॅकलमध्ये महाराष्ट्रातील आठ जणांच्या संघात प्रशांत भांडकोळी याची तर सिनिअर डिव्हिजन मधील नेमबाजांच्या अंतिम आठच्या संघात अक्षय निकम निवडला गेला आहे. जून महिन्यापासून महाराष्ट्र संघाच्या निवडीची प्रक्रिया होती. मानसिक आणि शारिरीक क्षमतांची कसोटी पाहणारी ही निवड प्रक्रिया असते. संपूर्ण महाराष्ट्रातून वरील प्रकारामध्ये प्रत्येकी आठ छात्र निवडले जातात”.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य मिलिंद देशपांडे, प्रबंधक अशोक असेरी, प्रा.राजेश पाटणी आदी उपस्थित होते. निवड झालेल्या छात्रांचे 57 महाराष्ट्र NCC चे कमांडिंग अधिकारी कर्नल आर. राजेश, प्रशासकीय अधिकारी कर्नल एस. एस. जगताप आणि सुभेदार मेजर बजरंग सिंग आणि नेमीचंद घोडके यांनी काैतुक केले आहे.