शास्त्रज्ञ राॅस मिशेल यांचे नवी पुस्तक ‘द नेक्स्ट सुपरकाॅन्टिनेंट’ प्रकाशित झाले आहे. या पुस्तकातून त्यांनी माेठे भाकिते वर्तवली आहे. भविष्यात पृथ्वीवरील खंडांची शाश्वती नाही, असे त्यांनी या पुस्तकात म्हटले आहे. आज पृथ्वीर सात खंड आहेत. हे खंडांची भविष्यातील संख्या किती असेल हे सांगता येणार नाही, असे त्यांनी पुस्तकात म्हटले आहे.
‘द नेक्स्ट सुपरकाॅन्टिनेंट’ पुस्तकात राॅस यांनी भुतकाळाबराेबर भविष्यातील पृथ्वीतळावर हाेणार बदल सांगितले आहे. तसे भाकितच वर्तवले आहे. आज सर्व सात खंड एकमेकांना जाेडले गेले आहेत. परंतु भविष्यात हे खंड असेच असतील, हे सांगता येणार नाही. पृथ्वी कशी दिसेल हे देखील सांगता येणार नाही. पृथ्वीवरील सर्व खंड एकेकाळी एकत्र हाेते. त्यातून सुपरकाॅन्टिनेंट्सची निर्मिती झाली.
साधारण 300 ते 200 मिलियन वर्षापूर्वी पाैंजिया सुपरकाॅन्टिनेंट हाेते. डायनासाेरचे अस्तित्व असल्याचा ताे काळ आणि पृथ्वीचे केंद्र हाेते. ते म्हणजे सध्याचे आफ्रिका हाेय. त्याअगाेदर म्हणजेच एक अब्ज वर्षापूर्वी पृथ्वीचा अधिक भाग हा उत्तर अमेरिका आणि ग्रीनलॅंड प्रमाणे हाेता. त्याच्या अगाेदर दाेन अब्ज वर्षे सायबेरिया केंद्रीयत पहिले सुपरकाॅन्टिनेंट हाेते.
पृथ्वीवरीस सात खंडांमध्ये सध्या हालचाली पाहण्यासाठी सूक्ष्म अभ्यास करावा लागताे. शास्त्रज्ञ फिल्डवर्कच्या माध्यमातून एखाद्या पर्तवाचे वय निश्चित केले जाते. दाेन खंडाची धडक हाेऊन नव्या खंडाची निर्मिती हाेते. भविष्यात अशा प्रकारे एक नवा खंड तयार हाेणार आहे. ज्यामुळे आर्क्टिक महासागर नाहीसा हाेईल. अमासिया हा नवा सुपरकाॅन्टिनेंट तयार हाेईल, असे या पुस्तकात म्हटले आहे.
तसेच उत्तर अमेरिका आणि आशिया हे दोन खंड एकत्र आल्याने अमासिया या नव्या सुपरकॉन्टिनेंटची निर्मिती होईल. रॉस मिशेल यांची पुस्तकातील ही भविष्यवाणी खरी होईल की नाही यासाठी आणखी काही कोटी वर्ष लागतील.