स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI कार्ड) क्रेडिट कार्ड वापर करणाऱ्यांना ही बातमी महत्त्वाची ठरणार आहे. SBI च्या क्रेडिट कार्डधारकांना मोठा धक्का बसला आहे. कंपनीने क्रेडिट कार्डद्वारे भाडे भरण्यावर प्रक्रिया शुल्क वाढवले आहे. एसबीआय कार्डधारकांना पाठवलेल्या एसएमएसमध्ये सांगितले आहे की, आता त्यांना 99 रुपये + टॅक्सऐवजी 199 रुपये + टॅक्स भरावा लागणार आहे. SBI मधील हे बदल 15 मार्चपासून लागू होतील. यापूर्वी, SBI कार्डने नोव्हेंबर 2022 मध्ये क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी भाड्याच्या पेमेंटवर प्रक्रिया शुल्क 99 रुपये + कर वाढवले होते.
याचबराेबर ICICI बँक त्यांच्या क्रेडिट कार्ड धारकांकडून भाड्याच्या 1% प्रक्रिया शुल्क आकारत आहे. प्रक्रिया शुल्क 20 ऑक्टोबर 2022 पासून लागू झाले आहे. एचडीएफसी बँकेने क्रेडिटद्वारे भाडे भरण्यावर रिवॉर्ड पॉइंट्स 500 पर्यंत मर्यादित केले आहेत. व्यवहाराच्या रकमेच्या 1% + महिन्याच्या दुसर्या भाड्याच्या पेमेंटपासून लागू होणारे कर असणार आहे. बँक ऑफ बडोदा 1 फेब्रुवारी 2023 पासून क्रेडिट कार्डद्वारे भाड्याच्या पेमेंटवर 1% शुल्क देखील आकारत आहे. 3 मार्च 2023 पासून, IDFC फर्स्ट बँकेच्या क्रेडिट कार्डधारकांना क्रेडिट कार्डद्वारे भाड्याच्या पेमेंटवर 1% शुल्क भरावे लागेल. कोटक महिंद्रा बँकेने 15 फेब्रुवारी 2023 पासून व्यवहाराच्या रकमेच्या 1% + कर आकारण्यास सुरुवात केली आहे, काही अटींच्या अधीन.
