Ahmednagar College News ः चेन्नई येथे झालेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ कॉर्फबॉल स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सांघिक विजेतेपद मिळविले आहे. विजेत्या संघात साजरी परदेशी हीचा समावेश होता. नगरची खेळाडू असलेल्या साजरी परदेशी हिला या खेळात सुवर्णपदक प्राप्त झाले आहे.
अपेक्स विद्यापीठ , क्रिसेंट विद्यापीठ, एमडीयू विद्यापीठ , कॉलीकट विद्यापीठ, राजस्थान, रोहटक, केरळ या संघांचा पराभव करीत पुणे विद्यापीठाने प्रथम क्रमांकाचा चषक पटकाविला. साजरी परदेशी हिला तिने दिलेल्या संघातील योगदानाबद्दल व उत्कृष्ट खेळाडू म्हणून सुवर्णपदकाने गौरविण्यात आले . कॉर्फबॉल मुले व मुली एकत्रित असणाऱ्या खेळामध्ये साजरीने सर्व मॅचेसमध्ये लक्षवेधक कामगिरी करून नवोदित खेळाडू म्हणून मान मिळविला.
साजरी ही नगर कॉलेजची विद्यार्थिनी आहे. तिच्या या यशाबद्दल कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस, उपप्राचार्य व नगर कॉलेजच् प्राध्यापकांनी कौतुक केले आहे. साजरीला क्रीडा शिक्षक सॅवियो वेगस व क्रीडापटू गणेश वाळुंजकर यांचे मार्गदर्शन लाभले. साजरी ही राजेश परदेशी व ब्ल्यू जेम फाउंडेशनच्या संस्थापिक. निलम परदेशी यांची कन्या आहे.