राष्ट्रवादीचे आमदार राेहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या खासदारांविषयी माेठे विधान केले आहे. आमदार पवार हे ठाणे इथं हाेते. त्यामुळे त्यांनी केलेले वक्तव्य चर्चेत आले आहे. “भाजप हे कल्याण लाेकसभेची सीट मागून घेईल, नाहीतर खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्यासह शिंदे गटाच्या सर्वच खासदारांना कमळावर ही निवडणूक लढवावी लागेल”, असा दावा आमदार राेहित पवार यांनी म्हटेल आहे.
आमदार राेहित पवार म्हणाले, “भाजपची प्रवृत्ती अशी आहे की, लाेकनेत्यांना जवळ करायचे आणि संपवायचे. भाजपचे स्वतःचे जे लाेकनेते हाेते, मुंडे साहेबांपासून ते फुंडकर साहेबांपर्यंत, खडसे साहेबांपासून अनेक असे नेते आहेत, ज्यांना स्वतःच्याच नेत्यांनी राजकीय दृष्टिकाेनातून संपवले. असेच दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना देखील संपवित आहे. संपविले आहे”. श्रीकांत शिंदे हे स्वतः खासदार आहेत. तिथेच भाजप बैठका घेत आहे. तेव्हा भाजपच्या मनात काय आहे, याचा अंदाज येऊन जाताे. भाजप ही सीट मागू शकते. नाहीतर खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्यासह शिंदे गटाच्या सर्वच खासदारांना कमळावर ही निवडणूक लढवावी लागेल, असा अंदाज आमदार राेहित पवार यांनी म्हटले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून आपण पाहिले, तर कल्याण लाेकसभा मतदारसंघात भाजपविरुद्ध शिवसेनेचा शिंदे गट अशी परिस्थिती आहे. दाेन्ही पक्षातील पदाधिकारी एकमेकांवर कुरघाेडी करताना दिसत आहे. भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी, तर शिंदे गटावर जाहीर नाराजी व्यक्त करत आहे. टीका करत आहेत, असेही आमदार राेहित पवार यांनी म्हटले आहे.