राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार राेहित पवार यांनी अजित पवार गटावर टीका केली आहे. मला टार्गेट करण्याची रणनीती आणखण्यात आली आहे. हे मला त्यांच्याच नेत्यांकडून कळाले आहे, असा गाैप्यस्फाेट आमदार राेहित पवार यांनी केला आहे. आमदार राेहित पवार हे काल पिंपरी-चिंचवड दाैर्यावर हाेते. त्यावेळी त्यानी पत्रकारांशी संवाद साधला.
राेहित पवार यांनी अजित पवार गटावर यावेळी हल्लाबाेल चढवला. ते म्हणाले, “राष्ट्रवादीतील एक गट भाजपमध्ये सामील झाला. त्यांनी त्यांचे विचार स्वीकारले. अजितदांनी पूर्वी मीच भाजपसाेबत जाणार, असे वक्तव्य करणे हे हास्यापद आहे”. आतातर माझ्यावर बाेलण्यासाठी सर्वजण उड्या मारत आहेत. भाजपचा एक छाेटा नेता अजित दादांवर बाेलताे, तेंव्हा त्यांच्या गटातील सर्व गप्प बसतात काहीच बाेलत नाही. उलट गप्प बसून भाजप खूश करतात, असा आराेप राेहित पवार यांनी केला.
सुनील शेळके जे काही माझ्याविषयी बाेलत आहे, ते हास्यास्पद आहे. तथ्यहीन आहे. निधी वाटप करताना ब्लॅकमेलिंगचे काम सध्या सुरू आहे. हे चुकीचे असून, आतापर्यंत कधीच असे झालेले नाही. सत्तेसाठी पवार साहेबांच्या जवळचे नेते तिकडे गेले त्यांनी दगा दिला. त्यामुळे आम्ही आता संघर्षाची भूमिका घेतली आहे, असेही राेहित पवार यांनी स्पष्ट केले.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भूमिकेवर देखील राेहित पवार यांनी मत मांडले. ते म्हणाले, “नार्वेकर हे भला माणूस आहे. पण त्यांच्यावर दबाव आहे. त्यामुळे त्यांना दिल्लीला जावे लागत आहे. शिवसेना फुटीचा निकाल शिंदे गटाविरुद्ध घेणार नाहीत. न्यायालयाकडून निकाल लागला, असे प्रयत्न सुरू आहेत”.