Nagar Political News ः केडगाव उपनगराचा आम्ही सर्वजण मिळून एक विचाराने विकासाची कामे टप्प्याटप्प्याने मार्गी लावत आहेत. या कामासाठी खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांचे मोठे सहकार्य लाभले. आता केडगावमधील 110 रस्त्यांचा प्रस्ताव तयार केला असून त्याच्या मंजुरीसाठी प्रयत्न सुरू आहेत. माजी नगरसेवक मनोज कोतकर यांनी चांगले काम केले आहे. नागरिकांच्या सहकार्यातून चांगले काम उभे राहत असते. या माध्यमातून काम करण्यासाठी प्रेरणा आणि ऊर्जा मिळते, असे प्रतिपादन उद्योजक सचिन कोतकर यांनी केले.
केडगावमधील ताराबाग कॉलनी येथे माजी नगरसेवक मनोज कोतकर यांच्या पाठपुराव्यातून व खासदार सुजय विखे यांच्या प्रयत्नातून रस्ता डांबरीकरण कामाचा प्रारंभ उद्योजक सचिन कोतकर यांच्या हस्ते झाला. माजी नगरसेवक सुनील कोतकर, जालिंदर कोतकर, बच्चन कोतकर, सोनू घेंबूड, भूषण गुंड, श्याम कोतकर,सुधा लाटे, नमिता देशपांडे, रत्नप्रभा चव्हाण, पद्मावती सोमवंशी, दीपा भंडारी, सुरेखा वडागे, माया राजहंस,ललिता धामणे, दत्ता नन्नवरे,सचिन माताडे ,सरजील शेख ,सचिन बोर्डे, सुनील वाबळे अनिल राजहंस, किरण पोटे, अजय शिंदे, भाऊसाहेब बर्डे, बबन निकाळे, महेंद्र गायकवाड, जितेंद्र गायकवाड, रूपाली मकासरे आदी उपस्थित होते.
मनोज कोतकर यांनी खासदार सुजय विखे यांच्या प्रयत्नातून पुणे रस्ता ते देवी रस्त्याला जोडणारा ताराबाग कॉलनीतील रस्ता मंजूर झाला. हा दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. लवकरच रस्त्याचे काम पूर्ण होणार आहे. उद्योजक सचिन कोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली केडगाव परिसरामध्ये चांगले काम उभे राहत असल्याचा आनंद आहे.