हिंदी दिनानिमित्त अहमदनगर कॉलेजच्या हिंदी विभागाच्यावतीने प्राचार्य डॉ. रजनीश बार्नबस यांच्या मार्गदर्शनाखाली 16 आणि 17 सप्टेंबरला राष्ट्रीय लघुकथा लेखन ऑनलाईन कार्यशाळा झाली. हा कार्यक्रम 16 सप्टेंबरला दिल्ली इथल्या ज्येष्ठ साहित्यिक, लघुकथा लेखक, समीक्षक आणि संपादक डॉ. बलराम अग्रवाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डाॅ. अग्रवाल यांनी लघुकथा आणि कथा यातील फरक स्पष्ट केला, लघुकथेच्या घटकांवर प्रकाश टाकला आणि शीर्षक लेखन आणि लघुकथा लेखनासाठी आवश्यक प्रतिकात्मकता यासंबंधी अतिशय महत्त्वाची माहिती दिली.
मध्यप्रदेश (इंदूर) इथल्या लघुकथा लेखिका आणि अनुवादक अंतरा करवडे यांनी अतिथी मार्गदर्शक म्हणून 17 सप्टेंबरला कार्यशाळेत सहभागी झाल्या. लघुकथा लेखनाच्या संदर्भात प्रयोगशीलता आणि माध्यम, प्रतिकात्मकता, भाषा इत्यादी प्रचलित पद्धतींचा विचार कसा करावा याबाबत अंतरा करवडे यांनी कार्यशाळेत उपस्थितांना अतिशय सोप्या शब्दात मार्गदर्शन केले. दोन्ही दिवशी लघुकथेबाबत अतिशय रंजक आणि अचूक माहिती मिळाली.
या कार्यक्रमात अमेरिकेचे प्रदीप वाघ, इंग्लंडचे डॉ. वंदना मुकेश, जयपूरच्या अनिता सैनी, भोपाळचे मनोरमा पंत आणि देश-विदेशातील लघुकथा लेखकही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. हिंदी विभागाचे अध्यक्ष प्रा.डॉ. रिचा शर्मा, डॉ. पूर्णिमा बेहेरे, प्रा. चेतन रवेलिया व प्रा.सबिना शेख आदी उपस्थित होते. 16 सप्टेंबरच्या कार्यशाळेत पाहुण्यांचे स्वागत चेतन रवेलिया यांनी केले. डॉ. रिचा शर्मा, उपप्राचार्य प्रा. डॉ. प्रीतम बेदरकर, डॉ. पूर्णिमा बेहेरे, प्रा. सबिना शेख आदी उपस्थित हाेते. 17 सप्टेंबरला कार्यशाळेत डॉ. पूर्णिमा बेहेरे, डॉ. ऋचा शर्मा, उपप्राचार्य प्रा. नोएल पारगे, चेतन रवेलिया व सादिया शेख सहभागी झाले हाेते.