बालरंगभूमी परिषदेच्या अहमदनगर शाखेच्यावतीने मानसी भणगे स्मृती नाट्यछटा स्पर्धेचे आयोजन अहमदनगरमधील सारडा महाविद्यालयात करण्यात आले होते. या स्पर्धांना बालकांनी उदंड प्रतिसाद दिला. स्पर्धेचे उद्घाटन माजी नियामक मंडळ सदस्य सतिष शिंगटे व बालरोगतज्ञ डॉ. चेतना बहुरूपी यांच्या हस्ते झाले. तीन गटात झालेली ही स्पर्धा दिवसभर सुरु होती.
नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे कोषाध्यक्ष सतीश लोटके, नियामक मंडळाचे सदस्य क्षितिज झावरे, प्रा.संजय दळवी, ज्येष्ठ रंगकर्मी अनंत जोशी, अभिनेते प्रा.रवींद्र काळे, आरती अकोलकर यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली. यावेळी बालरंगभूमीच्या अहमदनगर शाखेच्या अध्यक्षा उर्मिला लोटके, प्रमुख कार्यवाह प्रसाद भणगे, स्पर्धा प्रमुख प्रमुख टीना इंगळे, शैलेश देशमुख आदींसह सदस्य, नाट्यकर्मी, पालक उपस्थित होते.
सतीश लाेटके म्हणाले, “साधा व सुटसुटीत अभिनय कला प्रकार असलेल्या नाट्यछटा स्पर्धांचे ज्ञान मुलांना व्हावे, यासाठी नगरमध्ये दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन बालरंगभूमी परिषद करत आहे. मुलांनी सोप्या विषयांची निवड करून अशा स्पर्धांमध्ये भाग घ्यावा. नाट्यछटा स्पर्धा ही स्टेजवर प्रवेश करण्याची पहिली पायरी आहे. त्यामुळे स्टेज डेरिंग वाढण्यासाठी व आपल्यातील अभिनय बाहेर काढण्यासाठी लहानपणापासूनच मुलामुलींनी अशा स्पर्धांमध्ये भाग घेत रहावा”. अहमदनगरच्या बालरंगभूमी परिषदेचे काम उत्कृष्टपणे सुरु आहे. परिषदेच्या उपक्रमांमुळे लहान मुलांना प्रोत्साहन मिळत आहे, असेही सतीश लोटके म्हणाले.
क्षितिज झावरे यांनी मोबाईलच्या अती वापरामुळे आपली पिढी बरबाद होण्याच्या मार्गावर आहे. सुजान पालकांनी वेळीच जागृत होणे गरजेचे आहे. मुलांना मोबाईल पासून दूर करण्यासाठी नाट्यछटा स्पर्धा उपयुक्त ठरतील. बालकांचा आत्मविश्वास वाढवून व्यक्तिमत्व विकास करण्याबरोबरच नवे अभिनेते घडवणारी ही स्पर्धा आहे, असे सांगितले.
उर्मिला लोटके यांनी प्रास्ताविक केले. स्पर्धेचे परिक्षक प्रा.संजय दळवी, अनंत जोशी आदींनी स्पर्धक बालकांना मार्गदर्शन केले. यावेळी रूपाली रोहकले, सदस्य सुजाता पायमोडे, सोनाली दरेकर, सागर अलचेट्टी, श्रिया देषमुख, सपना साळुंके विद्या जोशी, एकता भारताल, संध्या पावसे, प्रिया ओगले, मोनिका संकलेचा आदी उपस्थित होते. बालरंगभूमीचे कार्यवाह प्रसाद भणगे यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष देवीप्रसाद सोहनी यांनी निकालाचे वाचन करून आभार मानले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे :
गट क्रमांक पहिला ः सर्वोकृष्ट पारितोषिक श्रीयांस घोडके, सायली गिरी व मनस्वी भणभणे. उत्कृष्ट परितोषिक आस्था भंडारी, ओवी तागड, व अनय घाटेवाळ.
गट क्रमांक द्वितीय ः सर्वोकृष्ट पारितोषिक देवेन उगले, रुद्र मैड व इषिता उगले. उत्कृष्ट पारितोषिक भूपेंद्र झिने, सिराज सरडे व अथर्व खिलारी.
गट क्रमांक तृतीय ः सर्वोत्कृष्ट परितोषिक कालिका जावळे, विनय चेडे व महेश्वरी वाळूंज. उत्कृष्ट पारितोषिक मुग्धा देवचके, संकर्षण धर्माधिकारी व अनुष्का कोरडे. याशिवाय तिन्ही गटात उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.