Ahmednagar Political ः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आली. शहरात झालेल्या निर्धार बैठकीत संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव व राज्य उपाध्यक्ष विजय वाकचौरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जया गायकवाड यांची महिला जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर मंगेश मोकळ यांची भिंगार शहराध्यक्षपदी, आकाश बडेकर यांची नगर युवक तालुकाध्यक्षपदी, निशा जाधव यांची युवती जिल्हाध्यक्षपदी व नगर तालुका युवती अध्यक्षपदी वैशाली पाखरे यांची निवड करण्यात आली.
या बैठकीला उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, राज्य सचिव राजाभाऊ कापसे, दिपकराव गायकवाड, विभागीय जिल्हाप्रमुख भिमराज बागुल, रिपाई नेते अजय साळवे, जिल्हाध्यक्ष संजय भैलुमे, गौतम घोडके, विलास साठे, युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, पारनेर तालुकाध्यक्ष राजेंद्र उबाळे, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष राजाभाऊ जगताप, पाथर्डी तालुकाध्यक्ष बाबा राजगुरू, शेवगाव तालुकाध्यक्ष सतीश मगर, शहर जिल्हाध्यक्ष नाना पाटोळे, नगर तालुकाध्यक्ष चंद्रकांत ठोंबे, युवक शहराध्यक्ष निखिल साळवे, माजी सरपंच रामकिसन साळवे, कर्जत शहराध्यक्ष सोहन कदम उपस्थित होते.
श्रीकांत भालेराव म्हणाले, “तळागाळात काम करणारे पदाधिकारी व कार्यकर्ते हीच रिपाईची खरी शक्ती आहे. प्रत्येक गावात वाडी-वस्ती मधील ग्रामस्थांशी रिपाईचे कार्यकर्ते जोडले गेले आहे”. या लोकसभेच्या निवडणुकीत रिपाईच्या माध्यमातून उमेदवार दिल्या गेल्यास एक जुटीने सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते काम करुन लोकसभेची जागा नाकारणाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय कार्यकर्ते गप्प बसणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्य सचिव राजाभाऊ कापसे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे कौतुक करुन रिपाईला अधिक सक्षम करण्यासाठी कामाला लागण्याचे आवाहन केले.
जया गायकवाड यांनी जिल्ह्यात महिलांचे मोठ्या प्रमाणात प्रश्न असून, रिपाईच्या माध्यमातून ते सोडविण्याचे काम केले जाणार आहे. महिलांचे संगठन उभे करुन महिला सशक्तीकरणाला चालना देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच इतर नूतन पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे ध्येय-धोरण समोर ठेवून पक्ष वाढीसाठी सर्वपरीने प्रयत्न करणार असल्याचा संकल्प केला.