गणेशाेत्सव असलेला सप्टेंबर महिना संपत आला आहे. पुढील महिना ऑक्टोबरचा असून, यात काही आर्थिक नियम बदलणार आहेत. याचा पैशाची संबंध असल्याने त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर पडणार आहे. त्यामुळे आर्थिक गाेष्टींशी निगडीत असलेले नियम जाणून घेणे गरजेचे आहे.
रिझर्व्ह बॅकेने सप्टेंबर 2023 पर्यंत दाेन हजार रुपयांच्या नाेटा बदलण्याची मुदत दिली आहे. यानंतर या नाेटा चलनातून बाद हाेणार आहे. त्यामुळे दाेन हजार रुपयांच्या नाेटा असतील, तर त्या आजच बदलून घ्या. पुढील महिन्यापासून परदेशी टूर पॅकेज खरेदी करणार असाल, तर सात लाख रुपयांपेक्षा कमी टूर पॅकेज खरेदी केल्यास तुम्हाला पाच टक्के TCS भरावे लागले. सात लाखांपेक्षा जास्त किमतीचे टूर पॅकेज असले, तर 20 टक्के TCS भरावा लागेल. याची माहिती करून घ्या.
सेबीने डीमॅट आणि ट्रेडिंग खात्यांमध्ये नामांकन अनिवार्य केले आहे. त्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबरला संपणार आहे. या तारखेपर्यंत काेणत्याही खातेदाराने नामनिर्देशन केले नाही, तर ते खाते 1 ऑक्टाेबरपासून गाेठवले जाणार आहे. यामुळे डीमॅट आणि ट्रेडिंग करता येणार नाही. सेबीने डीमॅट आणि ट्रेडिंग खात्यांच्या नामांकनासाठी 31 मार्च ही अंतिम मुदत निश्चित केली हाेती. नंतर ती सहा महिने वाढवली.
छाेट्या बचत याेजनांमध्ये आधार अनिवार्य करण्यात आले आहे. PPF, SSY पाेस्ट ऑफिस स्किम इत्यादींमध्ये आधारची माहिती टाकणे गरजेचे आहे. तसे ते अनिवार्य आहे. तसे न केल्या 1 ऑक्टाेबरपासून ही खाती गाेठवली जातील.