भारतीय रिझर्व्ह बॅंकेने (RBI) सणासुदीच्या काळात दिलासादायक बातमी दिली आहे. रेपाे दर चाैथ्यांदा स्थिर ठेवला असून, ताे 6.5 टक्क्यांवर कायम राहणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या कर्जाचा हप्ता (EMI) स्थिर राहणार आहे. चलनविषयक धाेरण समितीची बैठक 4 ऑक्टाेबरला झाली. RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी चलनविषयक धाेरण समितीच्या निर्णयांची माहिती दिली.
RBI ने फेब्रुवारी 2023 मध्ये रेपाे रेट 6.5 टक्क्यापर्यंत वाढवला हाेता. यानंतर सलग चार बैठकानंतर ताे स्थिर ठेवला आहे. चलनविषयक धाेरणाची बैठक दर दाेन महिन्यांनी हाेते. या आर्थिक वर्षाची पहिली बैठक एप्रिलमध्ये झाली. तर गेल्या आर्थिक वर्षात रेपाे दरात सहा वेळा 2.50 टक्के वाढ करण्यात आली हाेती.
RBI गव्हर्नर महागाईचा अंदाज आणि जीडीपी (GDP) अंदाज देखील जारी करणार आहेत. RBI ने FY24 मध्ये चलनवाढीचा अंदाज 5.1 टक्के वरून 5.4 पर्यंत वाढवला हाेता. FY24 वास्तविक GDP वाढीचा अंदाज 6.5 टक्के राखला गेलाय. FY25 च्या पहिल्या तिमाहीत, वास्तविक GDP अंदाज 6.6 टक्के देण्यात आला हाेता. महागाईबाबत चिंता आणि अनिश्चितता अजूनही कायम आहे. तसेच इतर देशांच्या तुलनेत भारत जागतिक आव्हानांना समाेरे जाण्यास अधिक समक्ष असल्याचे RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी म्हटले आहे.