बाॅलिवूडचा बादशाह शाहरुख खान याचा ‘जवान’ चित्रपट बाॅक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. शाहरुख खान याने चित्रपटात साकारलेली भूमिकेची काैतुक हाेत आहे. ‘जवान’ने पहिल्याच दिवशी दमदार कमाई केली. जगभरात ‘जवान’ने 500 काेटींचा टप्पा पार केला आहे.
बाॅक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असलेला या चित्रपटाचे सीन्स साेशल मीडियावर चांगलेच व्हायरल हाेत आहे. प्रेक्षकांबराेबरच शाहरुख खान याचे कंगना, करीना, हृतिक ते थेट एसएस राजामाैली यांनीही या चित्रपटाचे काैतुक केले आहे. बाॅलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याने देखील पिंकव्हीलाचं ‘एक्स’वर पुन्हा शेअर करत शाहरुख खान याचे काैतुक केले आहे.
What massive success!!Congratulations my Jawan Pathaan @iamsrk 👏🏻 Our films are back and how. https://t.co/EwRPOCR2la
— Akshay Kumar (@akshaykumar) September 11, 2023
अक्षय कुमार याने ‘एक्स’मध्ये म्हटले आहे, “माझा जवान पठाण शाहरुख खानचे त्याच्या चित्रपटाला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल मनापासून अभिनंदन. आपल्या चित्रपटांनी पुन्हा जबरदस्त कमबॅक केला आहे”. यावेळी अक्षय कुमार याने जवानच्या कलेक्शनची आकडेवारी देखील ‘एक्स’वर शेअर केली आहे. ‘जवान’ हा चित्रपट बाॅलिवूडमधील सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा चित्रपट ठरला आहे.
याअगाेदरचा हा रेकाॅर्ड शाहरुखच्या ‘पठाण’ आणि सनी देओलच्या ‘गदर-2’ च्या नावे हाेता. आता यात ‘जवान’ने बाजी मारली आहे. या चित्रपटात शाहरुख खान, नयनतारा, विजय सेतुपती यांची मुख्य भूमिका आहे. याचबराेबर प्रियामणी, सान्या मल्हाेत्रा, रिद्धी डाेग्रा, आलिया, गिरीजा ओक यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहे. दीपिका पदुकोणचा कॅमिओ देखील यात आहे.