भारतीय रिझर्व्ह बॅंकेने (RBI) दाेन 2000 हजार रुपयांच्या नाेटांबाबत माेठा निर्णय घेतला आहे. 2000 हजार रुपयांच्या नाेटा बदलून मिळण्याची आज शेवटची संधी हाेती. आता त्यात वाढ करण्याचा निर्णय RBI ने घेतला आहे. RBI च्या नवीन घाेषणेनुसार 2000 हजार रुपयांच्या नाेटा 7 आॅक्टाेबरपर्यंत बदलून घेता येतील, किंवा जमा करता येतील. याशिवाय 8 तारखेपासून RBIच्या प्रादेशिक कार्यालयांमध्ये नाेटा जमा करता येतील.
RBI ने व्यवहारातून 2000 हजार रुपयांच्या नाेटा 19 मे पासून काढून घेण्याची घाेषणा केली हाेती. यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत बॅंकेत 2000 हजार रुपयांच्या नाेटा जमा करण्याची संधी दिली हाेती. ही मुदत आज संपली. ही मुदत संपल्याने RBI आता 2000 हजार रुपयांच्या नाेटांबाबत काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागले हाेते. RBI ने आज 2000 हजार रुपयांच्या नाेटांबाबत माेठा निर्णय जाहीर केला आहे. RBI ने 2000 हजार रुपयांच्या नाेटा बदलून घेण्यासाठी आता 7 आॅक्टाेबरपर्यंतची मुदत दिली आहे. या नाेटा RBI च्या प्रादेशिक केंद्रात जमा कराव्या लागणार आहे.
भारतीय चलनात 2000 हजार रुपयांच्या 3.56 लाख काेटी रुपयांच्या नाेटा हाेत्या. त्यापैकी 29 सप्टेंबरपर्यंत 3.42 लाख काेटी रुपयांच्या नाेटा जमा झाल्या आहेत. आता फक्त 0.14 लाख काेटी रुपयांच्या नाेटा जमा हाेणे बाकी आहे. एकूण आकडेवारीनुसार 29 सप्टेंबरपर्यंत 2000 हजार रुपयांच्या 96 टक्के नाेटा बॅंकेत जमा झाल्या आहेत. RBI ने आता ग्राहकांना सात ऑक्टोबरपर्यंत 2000 हजार रुपयांच्या नाेटा बदलून घेण्याची मुदत वाढवून दिली आहे. यानंतर आठ ऑक्टोबरपासून RBIच्या देशभरातील 19 प्रादेशिक कार्यालयांमध्ये एका व्यक्तीला दाेन हजार रुपयांच्या 20 हजार रुपये रकमेच्या नाेटा बदलून घेता येतील.
भारतीय पाेस्टाद्वारे RBI च्या 19 कार्यालयांकडे या नाेटा पाठवता येतील. ही रक्कम ज्यांच्या खात्यात जमा हाेईल, त्या व्यक्तीची आणि संस्थांना त्यांचे ओळखपत्रांचे पुरावे द्यावे लागणार आहेत.