सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आभार मानले आहे. सर्वाेच्च न्यायालयाने पुढील दाेन महिन्यांत दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचा आदेश दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी सर्वाेच्च न्यायालयाचे आभार मानले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दुकानावरील पाट्या मराठीत असाव्यात, यासाठी आंदाेलन छेडले हाेते. या मराठी पाट्यांच्या सक्तीविराेधात काही व्यापाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली हाेती. आता यावर सर्वाेच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. सर्वाेच्च न्यायालयाने निकालात, पुढील दाेन महिन्यांत महाराष्ट्रातील दुकाने, आस्थापनावर मराठी अक्षरांमध्ये पाट्या लागल्या पाहिजेत, असे स्पष्ट केले आहे.
राज ठाकरे यांनी सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालावर आभार व्यक्त करत इशारा देखील दिला आहे. मराठी पाट्यावर मनसेने अनेक वर्षे संघर्ष केला. आजच्या एका निर्णयाने त्याला मान्यता मिळाली. आता दुकानदारांनी नसत्या भानगडीत पडू नये आणि न्यायालयाच्या निर्णयाचा स्वागत करावे. सरकारने देखील या निर्णयावर लक्ष ठेवून कारवाई करावी. अन्यथा माझ्या महाराष्ट्र सैनिकांचे पक्ष लक्ष असेल, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला.
सस्नेह जय महाराष्ट्र
पुढील २ महिन्यांत महाराष्ट्रातील दुकानं, आस्थापन ह्यांच्यावर मराठी पाट्या लागल्याचं पाहिजेत असा स्पष्ट निकाल सुप्रीम कोर्टाने दिला, त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार. 'मराठी पाट्या' ह्या मुद्द्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेली कित्येक वर्ष…— Raj Thackeray (@RajThackeray) September 26, 2023
राज ठाकरे यांनी समाज माध्यमांवर देखील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “ज्या राज्याची जी भाषा आहे, त्याच भाषेत पाट्या असल्या पाहिजे. हा साधा नियम असायला हवा. त्याला विराेध करून इथल्या मूठभर व्यापाऱ्यांनी विराेध केला. न्यायालयात का लढा नेला? महाराष्ट्रात असाल, तर मराठी आणि इतर राज्यात असाल, तर तिथल्या भाषेत पाट्या असणे गरजेचे आहे. स्थानिक भाषेचा सन्माण करणे यात विराेध कशाला? व्यापारासाठी महाराष्ट्रात असेल, तर इथल्या भाषेचा सन्मान करायलाच हवा. माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी यावर संघर्ष केला. मूठभर व्यापाऱ्यांना ही चपराक आहे. याबाबत महाराष्ट्र सैनिकांचे अभिनंदन”, असे यात म्हटले आहे.